Shivsena Symbol Hearing : धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय नाही, पुढील सुनावणी शुक्रवारी

Shivsena Symbol Hearing : धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय नाही, पुढील सुनावणी शुक्रवारी

नवी दिल्ली : खरी शिवसेना कुणाची? शिंदे की ठाकरे कोणाला धनुष्यबाण मिळणार? याबाबत आज सुनावणी पार पडली. केंद्रिय निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होत. मात्र या सुनावणीमध्ये धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय झाला नाही. तर यासंदर्भात पुढील सुनावणी शुक्रवार 20 जानेवारीला होणार आहे.

त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय झालेला नाही. गेल्या आठवड्या देखील ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आजही दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात झाला. तर मोठ्या प्रमाणात शिंदे आणि ठाकरे गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. मात्र पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

या दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड करत शिवसेनेतून बाहेर पडले. यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले. त्यांनतर शिवसेना आमचीच आहे असा दावाही शिंदे यांनी केला. तर उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे.

दरम्यान दोन्ही नेत्यांकडून पक्ष चिन्हावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले असून शिवसेना नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू आहे. आज ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद केला. तर दुसरीकडे अँड मनिंदर हे कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर सुनावणीची पुढील तारीख देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube