कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही; अजित पवारांचा इशारा

कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही; अजित पवारांचा इशारा

नागपूर : सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले.

बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडला होता.

बोम्मई यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील विरोधीपक्ष हे संतप्त झाले आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील कर्नाटकच्या या भूमिकेवर सरकार काहीच करत नसल्याने टीका करत हल्ला चढवला. पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत हा प्रश्न आम्हाला पडला आहे. याचं उत्तर त्यांच्याकडून आलं पाहिजे.

कर्नाटकात अधिवेशनात आज सीमाप्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपुष्टात आला असून कर्नाटकातील सीमाभागात सर्व काही आलबेल आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube