‘…तर तुमची मिमिक्रीच केली जाणार’; उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवर प्रकाश आंबडेकर स्पष्टच बोलले

  • Written By: Published:
‘…तर तुमची मिमिक्रीच केली जाणार’; उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवर प्रकाश आंबडेकर स्पष्टच बोलले

Prakash Amdekar : 13 डिसेंबर रोजी दोन तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करत थेट प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या टाकल्या. यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, या सगळ्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहातून 141 खासदारांचं निलंबित करण्यात आलं. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, यावर निलंबनावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Amdekar) यांनी भाष्य केलं.

Amol Kolhe : जातीनिहाय जनगणना गरजेचीच, अमोल कोल्हेंनी कारणही सांगितलं 

आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी खासदारांच्या निलंबनाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, खासदारांना केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांना सुरक्षेबाबत स्पष्टीकरण मागण्याचा अधिकारी आहे. खासदार ज्या सभागृहात बसतात, तिथं घुसखोर कसे आले याची माहिती सभागृहाला देण्याचाही अधिकार खासदारांना आहे. मात्र, खासदारांवरच निलंबनाची कारवाई केली जाते. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मौन बाळगावे, सरकारला काही विचारू नये, अशी सरकारची अपेक्षा आहे, असं आंबेडकर म्हणाले.

Amol Kolhe : ‘शेतकरी अन् कांदा निर्यातबंदीवर जाब विचारला म्हणून निलंबन’; कोल्हेंनी सांगितली वेगळी स्टोरी 

ते म्हणाले, देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले, तरीही गृहमंत्री संसद सुरक्षेविषय कुठलंही स्टेटमेंट देत नाही. आधी लोकसभेची सुरक्षा लोकसभेच्या स्पीकर यांच्या अखत्यारीत होती. मात्र, पुढं 1996 मध्ये वॉच अॅण्ड वार्ड यांच्यासोबत दिल्ली पोलिसांचा स्टाफ संसदेच्या सुरक्षेसाठी वाढवला. दिल्ली पोलीस हे गृहमंत्र्याच्या अखत्यारित आहेत. त्यामळं गृहमंत्र्यांनी भाष्य केलं पाहिजे. खासदरांनी केलेली मागणी रास्त आहे, असंही ते म्हणाले.

संसद सुरक्षेवर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्य विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानं तृणमुल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली. याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले की, जशास तसं होणारच. संविधानिक पदावर बसलेले असतांना तुम्ही गरिमा दाखवली नाहीतर तुमची मिमिक्री केलीच जाणार. उपराष्ट्रपतींनी गृहमंत्र्यांना संसद सुरक्षेवर स्पष्टीकरण देण्याचे आदेश द्यायला हवे होते. मात्र, उपराष्ट्रपतींना तसं केलं नाही. उपराष्ट्रपती आपली जबाबदारीच विसरलेले दिसतात. त्यामुळं त्यांची मिमिक्रीच होणार, असं आंबेडकर म्हणाले.

यावेळी बोलतांना आंबेडकरांनी भापज आणि कॉंग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, 25 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून विषमतावादी व्यवस्था संपवली आणि संविधान आणून नवी समतावादी व्यवस्ता उभी केली. कॉंग्रेस, भाजप यासारखे पक्ष असतील किंवा आरएसएस सारखं संघटन असेल या सगळ्यांवर समतावादी व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी होती. मात्र, अजूहनी समतावादी व्यवस्था तयार झाली नाही. काहीजण भारत जोडो यात्रा काढतात. मात्र, त्यात काहींना वगळल्या जातं. कधी भाजपकडून मुस्लिमांचा द्वेष केला जातो. तर कधी आदिवासींना वगळल्या जातं, कधी मुस्लीम, तर कधी दलितांना वगळल्या जातं. एकमेकांविरोधातील द्वेष भावनना वाढू लागली, असं आंबेडकर म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube