VIDEO: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना तिघेच भेटले, मला हे खटकले होते; लक्ष्मण हाकेंची भुजबळांवर टीका

Laxman Hake-हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला. तो स्वतः पुतण्या आणि पोराला घेऊन गेला होता. ते तिघे होते आणि हे तिघे होतो. हे सगळं सभेत सांगितले होते.

  • Written By: Published:
Laxman Hake

Laxman Hake On Chhagan Bhujbal :ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लक्ष्मण हाके हे एका मोठ्या ओबीसी नेत्यावर थेट टीका करत आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघिल्यानंतर हाके हे पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) थेट बोलताना स्पष्ट होत आहे. त्यात त्यांनी भुजबळांचे नाव घेतलेले नाही. तर भाजपपमधील कोण आपल्याला मदत करतील, स्वॉफ्ट कॉर्नर राहतील, असे नाव हाके यांनी घेतलेले आहे. असे नावे घेतलेले नेते भाजपचे आहेत.

त्याची आपल्यामागे फरपट होत आहे. त्याचं कसं आहे त्यांच्याकडे आहे यंत्रणा, त्याच्याकडे आहे संघटन. मीडिया हँडल करण, मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं. ते म्हणाले आंदोलन करायचं नाही, मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी जीआर फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतराव, निवेदनं द्यावी. बोलला होता ना काय करायचं नाही म्हणून. माझ्या उपस्थितीत म्हणला होता की आंदोलन थांबवा, स्टेजवरच होतो ना मी पण, असे हाके सोशल मीडियावरील व्हिडिओत म्हणत आहेत.


Rajesh Mehta : LIC चे कार्यालय कुठे आहे? मला माहिती नाही; सेबी प्रकरणात राजेश महेताची प्रतिक्रिया

हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला. तो स्वतः पुतण्या आणि पोराला घेऊन गेला होता. ते तिघे होते आणि हे तिघे होतो. हे सगळं सभेत सांगितले होते. हे वाक्य मला खटकले होते, असे हाके यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे हे मात्र समजू शकलेले नाही.


Devendra Fadnavis : मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता; फडणवीस सरकारने घेतले 4 मोठे निर्णय 

भाजपचे तीन नेते स्वॉफ्ट कॉर्नर देतील
मला अंदाज आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला स्वॉफ्ट कॉर्नर देतील, असे हाके हे व्हिडिओ सांगत आहेत.

follow us