Ajit Pawar : अजितदादांचा बारामतीकरांना शब्द; मी शेवटपर्यंत….
Ajit Pawar On NCP : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. तरी देखील या चर्चा थांबायचे नाव घेत नाही. आज पु्न्हा एकदा या चर्चांवर अजितदादांनी भाष्य केले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज आपल्या बारामती मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना त्यांच्याविषयीच्या चर्चांविषयी देखील भाष्य केले आहे. विनाकरण माझ्याविषयी नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरु असतात. माझे कार्यक्रम रद्द झाले तरी चर्चा होतात किंवा मी नियोजित कार्यक्रमाला असलो तरी चर्चा होतात, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सुट्टीवर! प्रश्न विचारातचं अजितदादा भडकले, म्हणाले “नॉट रिचेबल माझ्यापुरतं…”
यानंतर बोलताना ते म्हणाले की, मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातचं राहणार, असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल त्याच्याशी मी सहमत असणार आहे, असे त्यांनी बारामतीकरांसमोर सांगितले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर “मला माहित नाही, नॉट रिचेबल माझ्यापुरतं बास झालं. तुम्ही ते मुख्यमंत्री कार्यालयाला विचारा,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर
यावेळी त्यांनी बारसू येथे होणाऱ्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीची भूमिका विकासाच्या बाजूने आहे पण विकास करत असताना पर्यावरणाचा नास झाला नाही पाहिजे. हे देखील आमचं मत आहे. आमच्या भावी पिढ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. निसर्गाचं नुकसान झालं नाही पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.