मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हॅलेंटाइन डेपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. सर्व प्रेमाने होईल, असा आमचा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार […]
नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य, केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्रातील महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकून शिंदे-फडणवीस सरकार बनवले असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे. हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. आमची बाजू न्यायाची आहे. सत्येची आहे. […]
नवी दिल्ली : आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयातलं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडं गेल्यास हे प्रकरण लांबण्याचीही शक्यता होतीच. पण आता 14 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं देण्याची मागणी सर्वोच्च […]
मुंबई : ‘ट्रोल होण्याची तर मला सवय झालीय. मी देवाचं भजन जरी म्हटलं तरी ट्रोल होते. पण ट्रोलर्सना धन्यवाद त्यांच्या ट्रोलिंगमुळे माझी आतली शक्ती जागी झाली आहे. त्यामुळे ट्रोलिंग मला फरक नाही पडत. उलट उर्जा येते की, मी आणखी चांगलं करावं. तर माझ्या गाण्याला लोकांनी सपोर्ट केला आहे. त्याचंच हे फळ आहे.’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री […]
अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी विधानपरिषदेत केली होती. या मागणीवर अहमदनगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर जिल्ह्याचे आधी विभाजन करा व त्यानंतर नामांतर करा अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी आपली […]
पुणे : राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे उमेदवार अनेक ठिकाणी जाहीर झाले आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डाॅ. रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार […]