‘त्या’ विधानानंतर पंकजा मुंडेंचा यूटर्न, म्हणाल्या…
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर यूटर्न घेतला आहे. मला जे सूचतं ते बोलते, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. दरम्यान, मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे, असं विधान मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं.
‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, मला जे नेहमी सूचतं ते मी बोलेन, ज्यावेळी मी भाषण करत असते मी समोरच्यांना उत्साह प्रेरणा देण्यासाठी करत असते. पण माझ्या वक्तव्याचा अनेकजण चुकीचा अर्थ काढत असतात. पण मी थांबत नाही, थकत नाही अन् झुकतही नाही. मी जे बोलत असते ते नेहमीप्रमाणे तेवढ्या प्रसंगापूरतंच बोलत असते, प्रत्येक ठिकाणी माझं भाषण वेगळं असतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
“शरद पवारांना खात्री पटली म्हणूनच ते…” : मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर उदय सामंत यांनी सांगितलं कारण
तसेच जे आजुबाजूला घडतं त्यावरुन लोक त्याचा अर्थ काढत असतात. त्यात कुणाचा दोष नाही आणि मी दखलही घेऊ शकत नाही. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
दहशतवादी जगाला का घाबरत आहेत? आयएसआयच्या प्लॅनमुळे दाऊद-हाफिजवर मृत्यूचे सावट
काय म्हणाल्या होत्या मुंडे?
मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.