Supriya Sule : मंत्रालयातील कंत्राटी कामगारांची देणी तातडीने द्या, सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule : मंत्रालयातील कंत्राटी कामगारांची देणी तातडीने द्या, सुप्रिया सुळे संतापल्या

मुंबई : ‘मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने त्यांनी संप पुकारला आहे. ही गंभीर बाब आहे. त्यांची देणी तातडीने द्या.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे.

याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मंत्रीमंडळात मंत्र्यांची संख्या कमी असून एक-एक मंत्री सहा ते सात खाती सांभाळत आहे. तर पाच-सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री आहे. यामुळे कामे अतिशय धिम्या गतीने होत आहेत. याशिवाय मंत्री देखील क्वचितच मंत्रालयात उपलब्ध असतात. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून या कामगारांना न्याय द्यावा. अशी विनंतीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर कंत्राटी कामगारांचा पगार न झाल्याने मंत्रालयातील कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठीची पास सेवा ठप्प झाली आहे. तर या संपामुळे मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी पासची गरज असते. पण आता या संपामुळे मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तर यामुळे सर्वसामान्यांची महत्त्वाची काम देखील ठप्प झाली आहेत. एकीकडे मंत्रालयातील कंत्राटी कामगारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube