Rane VS Kadam : तुम्हाला लोकसभा निवडणुकीतील नारायण राणे आणि रामदास कदम यांच्यातील वाद आठवत असेल. नारायण राणे यांनी भाजपकडून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला. त्यावर रामदास कदम प्रचंड चिडले. विश्वासघात करत आमच्या केसाने गळा कापू नका, अशा शब्दात कदमांनी राणे आणि भाजपला सुनावले. त्यावर नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल. यावरूनच भाजप (bjp) खासदार नारायण राणे आणि शिंदे गटाचे रामदास (Ramdas kadam) कदमांमध्ये किती टोकाचा संघर्ष हे स्पष्ट होतंय. आता राणे आणि कदमांचा संघर्ष दुसऱ्या पिढीत आलाय. या दोन पिढ्यांमध्ये कसा राजकीय कोकणी शिमगा सुरू आहे, हे आज पाहुया…
ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत, नाहीतर खुर्ची… योगेश कदम आणि नितेश राणे या दोन मंत्र्यांत जुंपली !
नारायण राणे आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय संघर्ष हा दीर्घकाळ चर्चेत राहिलेला विषय आहे. दोघेही शिवसेनेचे माजी नेते असून, त्यांच्यातील मतभेद आणि शाब्दिक चकमकी यांनी कोकणातील राजकारण नेहमीच तापत असते. दोघेही एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावान शिलेदार राहिलेले. तसे तर दोघांचे राजकारण हे मुंबईतून सुरू झाले. दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे खास. रामदास कदम हे कांदिवलीचे गटप्रमुख व शाखाप्रमुख होते. तर नारायण राणे हे चेंबूरचे शाखाप्रमुख राहिलेले. दोघेही कोकणातील. मुंबईतील राजकारणाला सुरुवात करून ते आपल्या मूळगावी कोकणात पुन्हा आलेले आणि राजकीय भरभराट मिळविलेले नेते. 1995 मध्ये युती सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा व गृहमंत्री राहिलेले. तर मनोहर जोशी यांच्यानंतर राणे हे मुख्यमंत्री झालेले. पण पक्षांतर्गत सत्तास्पर्धा आणि वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांच्यात तणाव कायम राहिलेला.
नारायण राणेंनी पक्ष सोडताच रामदास कदमांचा निशाणा
नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रामदास कदम यांनी राणेंवर थेट गद्दारीचा आरोप केला. यामुळे दोघांमधील वैर तीव्र झाले. 2014 मध्ये भाजप-युती सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेले रामदास कदम यांनी नारायण राणेंसारखा लाचार माणूस जगात नाही, असे त्यांनी म्हटले होते. 2018 मध्ये रामदास कदम यांनी नारायण राणेंवर पुन्हा टीका करताना त्यांना “भानसुळ” असे म्हटलं. कोकणी भाषेत संपलेले किंवा निष्प्रभ व्यक्ती असे म्हटले आहे. हा अपमान राणेंना चांगलाच झोंबला आणि त्यांनीही कदम यांच्यावर पलटवार केला. राणे यांच्या दोन्ही मुलांनी रामदास कदमांवर खालच्या पातळीवर टीका सुरू केली. बाळासाहेब असतील,राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात.. उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे.. रामदास कदमच्या रुपात!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही.. भूंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी कदमांवर केला होता.
पाणी बंद केल्याचं पत्र दिलंय, पण…; सिंधू करार थांबवल्याबद्दल आंबेडकर काय म्हणाले?
कोकणातील राजकीय समीकरणे बदलली पण कटुता कायम
या दोन नेत्यांमधील वादामुळे कोकणातील शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणे बदलली. राणेंच्या भाजप प्रवेशानंतर कदम यांनी शिवसेनेच्या स्थानिक पाठिंब्याला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर रामदास कदम हे त्यांच्याबरोबर गेले. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये राणे आणि कदमांमध्ये तू-तू मैं सुरू होती. पण नारायण राणे खासदार झाले. नितेश राणे हे भाजपकडून तर निलेश राणे हे शिवसेनेकडून आमदार आहे. तर योगेश कदम दापोलीतून निवडून आले. नितेश राणेंना भाजपने, तर योगेश कदमांना एकनाथ शिंदेंनी मंत्रिपद दिले आहे.
राणेंचा आरोप कदमांच्या जिव्हारी
परंतु आता दोघांमध्येही वाद पेटला आहे. दापोली येथे धार्मिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. त्यावर नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री असलेल्या रामदास कदमांवर त्यांच्या मतदारसंघात जावून हल्ला चढविला. दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला गृहमंत्री योगेश कदमांनी वाचविले असा आरोप राणे यांनी केला. कोण असेल वाचविणारे कुठे बसलेले आहे. ते काय देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. राणेंचा हल्ला योगेश कदमांनी जिवारी लागला आणि तेही चिडले. पण माझ्या मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला बाहेरून आलेल्यांनी शिकवण्याची आवश्यकता नाही. ज्यांचे स्वतःच्या भागात नियंत्रण नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहावे, असा पलटवार त्यांनी केला. महायुतीमध्ये असलेल्या दोन्ही मंत्र्यांनी अशी एकमेंकावर टीका करणे म्हणजे राणे कदम संघर्ष हा दुसऱ्या पिढीत सुरू आहे, हे अधोरेखित करतोय हे नक्की.