जनता जर तत्त्व आणि निष्ठेच्या बाजूने नसेल तर… तनपुरेंनी 20 एप्रिलपूर्वीच स्पष्टच सांगितलं

Prajakt Tanpure राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणारे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले.

Prajakt Tanpure

Prajakt Tanpure gives hint to join BJP : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणारे शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी 20 तारखेला आपण भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी जनता जर तत्त्व आणि निष्ठेच्या बाजूने नसेल तर आमच्याही मनात विचार घोंगावतात, असं म्हणत भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय म्हणाले प्राजक्त तनपुरे?

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे हे 20 तारखेला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने तनपुरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना तनपुरे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये जाण्याची स्पष्ट संकेत दिले.

तासाभरात सात खोटे दावे अन् ट्रम्प यांचा पुन्हा बॉम्ब हल्ल्याचा अल्टिमेटम; इराणचाही तगडा पलटवार

तनपुरे म्हणाले की, ज्यावेळी अजित पवार हे बंड करून महायुतीमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी मी पक्षनिष्ठा आणि विचारांना प्राधान्य देत शरद पवार पक्षासोबतच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र माझ्या सोबत असणारे मंत्री दादांबरोबर केले आणि कॅबिनेट मंत्री झाले, पण यामुळे आमच्यासारख्या निष्ठावंतांचे राजकारण मात्र संपत चाललं आहे. याचं दुःख होतं. त्याचबरोबर 2024 ला त्याच लोकांना जनतेने निवडून देणे म्हणजे जनताच तत्व आणि त्याच्या बाजूने नसल्याने आमच्या मनात देखील असे विचार घोंगावतात. असं म्हणत तनपुरे यांनी भाजपमध्ये जाण्याची स्पष्ट संकेत दिले आहेत.

follow us