इथंही मतांची चोरी? गोकुळमध्ये 4 संचालक नेमण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi on Gokul Dairy: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात 4 शासननियुक्त संचालक नेमण्याल्याने काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपवर टीका केली.

Rahul Gandhi on Gokul Dairy

Rahul Gandhi on Gokul Dairy: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात 4 शासननियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला, पण भाजपने नियम बदलून बहुमताची चोरी केली,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली. दूध उत्पादकांच्या मतांचा हा अपमान असून शेतकरी हे कधीही विसरणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव अन् भारतीय शेअर बाजारात तेजी ; सेन्सेक्स 1,500 अंकांनी उसळला

 

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने 13 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. तर महायुतीला 12 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे सतेज पाटील (Satej Patil) यांच्या गटाकडे एका जागेचं बहुमत आहे.

मात्र, राज्य सरकारने गोकुळमध्ये 4 शासननियुक्त संचालक नेमण्याचा आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे महायुतीचं संख्याबळ 12 वरून 16 होऊ शकतं. परिणामी, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीतही महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

“गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. मात्र, त्यानंतर भाजपने निवडणुकीचे नियम बदलले. गोकुळमध्ये 4 संचालक घुसवले आणि 12 चे 16 करून बहुमताची चोरी केली. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी असून जनादेशात केलेली मिलावट आहे.

भाजप इतका हताश झाला आहे की, प्रत्येक ठिकाणी सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे.

दूध उत्पादकांची मतं चोरणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, शेतकरी कधीही विसरत नाही.”

गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’; रोहित पवारांचा हल्लाबोल

याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भाजपवर जनादेशात फेरफार केल्याचा आरोप केला आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचं म्हणत त्यांनी दूध उत्पादकांच्या मतदानाचा आदर करण्याची भूमिका मांडली. ‘दूध उत्पादकांची मतं चोरणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, शेतकरी कधीही विसरत नाही,’ असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.

follow us