‘शरद पवारांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिला तरी इंडिया आघाडीत त्यांचं स्थान कायम’; राहुल गांधींचं मोठं विधान!

Rahul Gandhi शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला तरी इंडिया आघाडीतील त्यांचं स्थान बदलणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

Rahul Gandhi on Sharad Pawar Delimitation Bill

Rahul Gandhi on Sharad Pawar Delimitation Bill: डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापलेलं असताना शरद पवारांच्या भूमिकेबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला, तरी इंडिया आघाडीतील त्यांचं स्थान बदलणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पवारांच्या भूमिकेवरून इंडिया आघाडीत मतभेद निर्माण होणार का, याबाबत सुरू असलेल्या चर्चेला त्यांच्या विधानामुळे महत्त्व प्राप्त झालं आहे.

करंट दिला, अश्लिल कृत्य करायला लावून व्हिडिओ काढले; पुण्यात हादरविणारी घटना

 ‘850 हा आकडा लक्षात ठेवा, भारतीय लोकशाहीच्या हत्येचं प्रतीक’

दरम्यान, राहुल गांधी यांनी डिलिमिटेशन प्रक्रियेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘ जेनझींनी (Gen Z) म्हणजेच तरुणांनी 850 हा आकडा लक्षात ठेवावा. हा आकडा भारतीय लोकशाहीच्या हत्येचं प्रतीक आहे,’ असं म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, 850 जागांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना देशातील मतदारसंघांची रचना आपल्या इच्छेनुसार बदलण्याची मोकळीक मिळणार आहे. यामुळे देशाचा नकाशाच बदलण्याचा प्रयत्न होईल आणि सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता कायम ठेवण्यास मदत होईल, असा आरोप त्यांनी केला.

‘शेती वगैरे काही नाही, राजकारण हाच आपला मुख्य व्यवसाय; बाकी सगळे जोडधंदे’; प्रीतम मुंडेंच्या विधानाची चर्चा!

‘डिलिमिटेशन कमिशनवर मोदी-शाह यांचं नियंत्रण’

डिलिमिटेशन कमिशनच्या रचनेवरही राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या दाव्यानुसार, या आयोगात ज्ञानेश कुमार यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे एक माजी न्यायाधीश आणि तिसरा सदस्य असेल. माजी न्यायाधीशांची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करतील, तर तिसऱ्या सदस्याची निवड स्वतः ज्ञानेश कुमार करतील, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

या रचनेमुळे डिलिमिटेशन प्रक्रियेवर मोदी आणि शाह यांचं पूर्ण नियंत्रण राहील, असा आरोपही त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नसल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

‘निवडणूक आयोगावर कब्जा, आता देशाचा नकाशा बदलण्याची तयारी’

निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांनी कब्जा केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. आता डिलिमिटेशन कमिशनच्या माध्यमातून देशातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचं ते म्हणाले.

‘ये प्रेम मोल लिया’ पाहून आयुष्मान खुरानाची आई भावुक, चित्रपटाला दिले 100 पैकी 100 गुण, मुलाचा अभिमान व्यक्त करत म्हणाली…

‘ज्ञानेश कुमार यांनी देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त होताना पाहिली आहे. आता ते देशाच्या रचनेच्या विनाशावर देखरेख करणार आहेत,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली. या प्रक्रियेमुळे देशातील लोकशाही आणि तरुणांचं भविष्य धोक्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.

शरद पवारांच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत दुरावा नाही?

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला, तरी त्यांचं इंडिया आघाडीतील स्थान कायम राहील, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. पवार यांच्या भूमिकेमुळे त्यांच्याशी असलेले राजकीय संबंध किंवा आघाडीतील त्यांचं महत्त्व कमी होणार नसल्याचा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे.

Delimitation Bill : पवारांच्या राष्ट्रवादीत पहिला राजीनामा पडला; विचारांशी केलेली गद्दारी…

त्यामुळे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवारांची भूमिका आणि राहुल गांधी यांची भूमिका वेगळी असली, तरी इंडिया आघाडीतील एकजुटीवर त्याचा परिणाम होणार नसल्याचं राहुल गांधी यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे.

follow us