अमित ठाकरेंच्या मोदी फोटो वादावर राज ठाकरेंची भूमिका; “फोटो लावा पण तो दुसऱ्या भिंतीवर”
Raj Thackeray Targets Modi Over Photo ठाण्यातील मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींच्या फोटोवरील वादासह धर्म, जीडीपी आणि अमित शाह टीका केली.
Raj Thackeray Targets Modi Over Photo : ठाण्यातील मनसे मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या काही दिवसांतील विविध घडामोडींवर भाष्य करत सरकारच्या धोरणांवर आणि राजकीय वातावरणावर निशाणा साधला. अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो काढल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादावर बोलताना राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांसारख्या महापुरुषांच्या रांगेत इतर कोणालाही स्थान देता येणार नाही, अशी भूमिका मांडली.
पुण्यात विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ मोर्चा; विद्यानंद बापट सहभागी होण्याची शक्यता?
सरकारी कार्यालयांमध्ये पंतप्रधानांचा फोटो लावावा, मात्र तो महापुरुषांच्या रांगेत न लावता स्वतंत्रपणे लावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये कोणते फोटो कुठे लावावेत, याबाबत शिस्त असली पाहिजे, असेही ते म्हणाले.
देशातील वातावरणावर भाष्य करताना, “धर्माभिमानी असलं पाहिजे, धर्मांध नको,” असे सांगत धर्माच्या नावावर लोकांना गुंतवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, जीडीपी वाढला असे सांगितले जात असताना सोनं खरेदी करू नका, असे का सांगितले जाते, असा सवाल करत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला.
भाषणात धनंजय महाडिकांची ‘स्लीप ऑफ टंग’; पक्षाचा अन् मुलाच्या पदाचा पडला विसर!
अमित शाह यांच्या हिंदीवरील वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. “हिंदी संमेलनाला येऊनही अमित शाहांची हिंदी चांगली होणार नाही,” असे म्हणत हिंदीच्या मुद्द्यावरून जनतेला गुंतवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.