राज ठाकरेच खऱ्या अर्थाने ‘हिंदूसम्राट’ म्हणत कांचनगिरी माँ यांनी पुन्हा दिलं अयोध्यचं निमंत्रण
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहे. मध्यंतरी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. परंतु, भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह (MP Brijabhushan Singh) यांनी विरोध केल्यामुळे दौरा रद्द करावा लागला होता. पण, आता कांचनगिरी माँ (Kanchangiri Maa) यांनी राज ठाकरेंना अयोध्येच खास निमंत्रण दिले आहे.
कांचनगिरी माँ या सध्या मुंबईत आल्या आहेत. आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या भेटीमागचे कारणही सांगितले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंना ‘हिंदू सम्राट’ अशी उपमा दिली. “त्यांच्या आरोग्याविषयी मी चौकशी केली. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेतली. त्यांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं आरोग्य चांगलं राहायला हवं. आज राज ठाकरेंमध्ये खऱ्या अर्थाने ‘हिंदूसम्राट’ आपल्याला दिसतात. त्यामुळे मी त्यांना भेटायला आले”, असं माँ कांचनगिरी यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्दयावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये गुरु मॉं कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. गेल्या भेटीवेळी त्यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे आमंत्रण दिले होते. या निमंत्रणाखातर राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. पण, भाजप खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी विरोध केल्यामुळं त्यांना दौरा रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. कांचनगिरी माँ यांनी आज पुन्हा एकदा राज ठाकरेंना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. “राज ठाकरे अयोध्येला नक्कीच जातील. प्रकृती चांगली नसल्यामुळे ते अयोध्येला पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आता अयोध्येला जाण्याची तयारी सुरू होईल. तुम्हाला फार लवकर याची बातमी मिळेल की ते अयोध्येला येत आहेत. रामलल्ला सगळ्यांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या अयोध्येला येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही”, असं माँ कांचनगिरी यावेळी म्हणाल्या.
Nana Patole : तुमचे नेतृत्व कमकुवत होते का? , पटोलेंचा राऊतांवर पलटवार
यावेळी त्या बोलतांना म्हणाल्या, देशातील मुलींचे ३५ तुकडे केले जात आहे. हिंदू विचारसरणीचे लोक एकत्र आले पाहिजे हिंदू राष्ट्र हा विचार असणे गरजेचा आहे. लवकरच अयोध्येबाबत कल्पना दिली जाईल. काही विरोध स्वतःला प्रसिद्धीसाठी समोर आले होते. पण आता त्यांचा विरोध मावळला आहे, असं म्हणत कांचनगिरी माँ यांनी ब्रृजभूषण सिंह यांना टोला लगावला.
गुरु माँ कांचनगिरी कोण आहेत? (Who is Maa Kanchangiri)
गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं. 1991 पासून त्यांनी युरोपीय देशात भारतीय सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. त्या गेल्या 20 वर्षांपासून त्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. महाकाल मानव सेवान समितीच्या माध्यमातून त्या पर्यावरणाची जागृती करतात.