नागपूर अधिवेशनात कर्जत एमआयडीसीचा मुद्दा गाजणार ! उद्योगमंत्र्यांची बैठक, अधिसूचना निघणार ?

  • Written By: Published:
नागपूर अधिवेशनात कर्जत एमआयडीसीचा मुद्दा गाजणार ! उद्योगमंत्र्यांची बैठक, अधिसूचना निघणार ?

Ram Shinde VS Rohit Pawar :नागपूर : नगर जिल्ह्यातील कर्जतमधील एमआयडीसीचा (Karjat Midc) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य राम शिंदे (Ram Shinde) यांच्यामध्ये कर्जत एमआयडीसीवरून पावसाळी अधिवेशनात जोरदार जुंपली होती. आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार आहे. उद्या मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. रोहित पवारही नागपुरात आहेत. त्यांची संघर्ष यात्रेची सांगता उद्या होणार आहे. त्यामुळे ते अधिवेशनात सहभागी होऊन हा मुद्दा उचलून धरतील. त्यामुळे पुन्हा राम शिंदे व रोहित पवार यांचा संघर्ष दिसून येईल.

नवं वाळू धोरण ते तलाठी भरती गैरप्रकार; अधिवेशनात थोरातांनी विखेंचं सगळचं काढलं

पावसाळी अधिवेशनात रोहित पवारांनी एमआयडीसीच्या अधिसूचनेचा मुद्दा उचलून धरला होता. त्यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती केली होती. परंतु अधिसूचना निघाली नाही. त्यामुळे रोहित पवारांनी राम शिंदेंसह सरकारवर टीका केली आहे. आता कर्जत एमआयडीसीबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी तीन वाजता नागपूर येथील विधानभवनात बैठक होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत एमआयडीसीचा मुद्दा राज्यात वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे.

ICC ने जाहीर केलं टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक, टीम इंडियाचा 20 जानेवारीला पहिला सामना

परंतु कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी 2015-16 पासून प्रयत्नशील आहेत. महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून कर्जत एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी मागील अधिवेशनात कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर त्यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये विधानपरिषदेत चर्चा घडवून आणली असल्याचे राम शिंदे सांगत आहेत. तर रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसी मंजूर झालेली आहे. परंतु हे सरकार ही अधिसूचना काढत नाही. राम शिंदेंमुळे ही अधिसूचना निघत नसल्याचा आरोपही रोहित पवारांनी यापूर्वीच केलेला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube