चार दिवसात अहमदनगरचं राजकारण फिरलं; वेळेवर बोललं की दखल घेतली जाते; राम शिंदेंचं सूचक विधानं

चार दिवसात अहमदनगरचं राजकारण फिरलं; वेळेवर बोललं की दखल घेतली जाते; राम शिंदेंचं सूचक विधानं

Ram Shinde on Ahilyanagar : राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले आहे. उस्मानाबादचे धारावाशिव केले आहे. आमच्या अहमदनगरचं नामांतरण का मागे ठेवले आहे? आता अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावं, अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे यांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात केली.

राम शिंदे पुढं म्हणाले की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती आहे. दोन वर्षांनी त्रिशतांबध्दी जयंती उत्सव सोहळा आहे. आतापर्यंत जयंती कार्यक्रमासाठी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष, अनेक वेळा मुख्यंमंत्री आले, राज्यमंत्री आले आहेत. पण आता आमची एकचं इच्छा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी या पवित्र भूमीला भेट दिली पाहिजे.

Ahmednagar Name Change : आता अहिल्यानगरच! मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच करून टाकली

राम शिंदे पुढं म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना विनंती केली होती की आमच्या जिल्ह्याच कृषी महाविद्यालय अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने व्हावे. त्यावेळी चार विद्यापीठांचा विरोध असताना देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गावापासून चार किलोमीटरवर हळगाव येथे केलं. त्यासाठी 65 कोटी रुपये दिले आहेत, असे राम शिंदे म्हणाले, ते पुढं म्हणाले की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे पशुसंवर्धन मंत्री आहेत. त्यांनी 10 हजार कोटी देऊन मेष महामंडळ काढले आहे, असे राम शिंदे म्हणाले.

Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…

आमदार राम शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राम शिंदेंना भाषणाला व्यत्यय येत होता. त्यामुळे राम शिंदे कार्यकर्त्यांना मिश्किलपणे म्हणाले की ‘ऐकून घेतलं पाहिजे आणि ऐकून नाही घेतलं की गेल्यावेळेस सारखं होतं. तुम्हाला माहिती आहे कसं झालं. आतापर्यंत झालं ते झालं. आपण समजदार आहात.’ असे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube