वायकरांचा शिवसेनेत प्रवेश; नेमकं तोंडावर कोण पडलं, सोमय्या की भाजप?

वायकरांचा शिवसेनेत प्रवेश; नेमकं तोंडावर कोण पडलं, सोमय्या की भाजप?

Ravindra Waikar : जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांनी मतदारसंघाततील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत जाणं गरजंच आहे,असं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं. आता वायकर महायुतीचा भाग झाल्यानं त्यांच्यावर आरोप करणारे किरीट सोमय्या (Kirit Somayya) चांगलेचं तोंडावर पडले.

Nana Patekar : कोण वायकर ? ‘नाना’ स्टाईल उलटं प्रश्न अन् राजकीय मुद्यावरून खुली ऑफर 

सोमय्यांचे आरोप काय?
किरीट सोमय्यांनी आतापर्यंत अनेक नेत्यावर भ्रष्टाचारे आरोप केले होते. काल महायुतीसोबत गेलेले रवींद्र वायकर यांच्याही मागे सोमय्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला होता. रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी हॉटेलचा भूखंड हा ₹3.93 कोटी मार्केट व्हॅल्यू किमतीचा होता, तो फक्त 3 लाखात (फक्त 1%) वायकर यांना मिळाला, हिसाब तो देना पडेगा, अशी टीका सोमय्यांनी केली होती.

Madhugandha Kulkarni: मराठमोळ्या अभिनेत्रीचं प्राणी प्रेमाबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत 

वायकरांची ईडीकडून चौकशी
वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप करत ते लवकरच तुरुंगात जातील. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे आरोप सोमय्या यांनी केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रवींद्र वायकर आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. तेव्हापासून वायकर यांची ईडीकडून चौकशी सुरू होती.

अखेर शिंदे गटात प्रवेश
वायकर यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यामुळं वायकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर काल त्यांनी ठाकरेंची साथ जोडत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे, आणि आता वायकर महायुतीचा भाग झाले. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे सोमय्यांनी आरोप केले, ते सर्वच नेते महायुतीची भाग झाल्यानं सोमय्या चांगलेच तोंडावर आपटत आहेत.

सोमय्यांनी आरोप केलेले नेते आज सत्तेत
सोमय्या यांनी प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, भावना गवळी, अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सोमय्या यांनी त्यांच्यावर 300 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप केला होता. त्यांनतर राणेंनी भाजपसोबत जाणं पसंत केलं आणि त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube