अजित पवारांच्या जखमेवर फडणवीसांनी चोळलं मीठ, म्हणाले….

अजित पवारांच्या जखमेवर फडणवीसांनी चोळलं मीठ, म्हणाले….

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या महिन्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपला निर्णय मागे घेतला आणि सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं. (Release me from the responsibility of the Leader of the Opposition; Devendra Fadnavis’ reaction on Ajit Pawar’s statement)

अजित पवारांनी केलेल्या वक्त्यावर पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, अजित पवार काय बोलले, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे कोणी कुठल्या पदावर काम करावं? हे त्यांनी त्याचं ठरवावं. यावर मी काय बोलणार? माझं एवढचं म्हणणं आहे की, शेवटी अजित पवार हे प्रभावी नेते आहेत. राष्ट्रवादी त्यांचा योग्य विचार करेल, असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दाढी कुरुवाळत बसतात; अजितदादांची टीका 

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलतांना अजित पवार म्हणाले की, मला विरोधी पक्षनेतेपदात फारसा रस नव्हता. मात्र आमदारांनी आग्रह केला. त्यांनी सह्या केल्या. नेतेमंडळींनी देखील सांगितलं की, तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळं मी त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. मात्र, आता मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबादारी द्या. मला संघटनेत कोणतंही पद द्या. तुम्हाला जे पद योग्य वाटेल, ते पद द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी कार्याध्यक्षपदी निवड केली होती. पवारांची ही घोषणा अजित पवारांसाठी धक्का मानली जात होती. त्यामुळं अजित पवार पुढे काय पाऊल उचलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, अजित पवार यांनी आज पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत काय निर्णय घेते हेच पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube