‘अयोध्येत नवा प्लॅन ठरणार, दंगली घडणार’; प्रकाश आंबेडकरांचं भाकीत

‘अयोध्येत नवा प्लॅन ठरणार, दंगली घडणार’; प्रकाश आंबेडकरांचं भाकीत

Prakash Ambedkar : 3 डिसेंबरनंतर अयोध्येत नवीन मोहिम आखली जाणार, त्यानंतर देशात आणि राज्यात दंगली घडणार असल्याचं भाकित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) केलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर सध्या राज्यभर दौरा करत आहेत. आंबेडकर यांचा आज सांगलीत दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

सर्वपक्षीय फेवरेट ‘मोपलवारांना’ अखेर हटवले; MSRDC मध्ये तब्बल दशकभरानंतर खांदेपालट

प्रकाश आंबेडकर म्हणाले, साताऱ्याच्या घटनेवरून हॅकिंग किती सोप्पं झालं आहे हे आता स्पष्ट झालंय. मुस्लिम मुलाचा मोबाईल हॅक करून वादग्रस्त अभद्र मजकूर लिहायचा आणि त्यातून दंगली घडवायचा, हा फ्लॅशबॅक लवकरच रिऍलिटीमध्ये येईल. 3 डिसेंबरला पाच राज्यांचा निवडणुकीचा निकाल येईल. त्यानंतर 6 डिसेंबरला अयोध्येत नवीम मोहिम उभारण्यात येईल मग काहीतरी वेगळं उभं राहणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

Uttarkashi tunnel collapse : कधी श्वास थांबला, कधी दिलासा मिळाला; पाहा मजुरांच्या रेस्क्यूचा घटनाक्रम…

गृहविभागाला याबाबत माहिती असल्यामुळे लोकल पोलीस ठाण्याला अलर्ट आला आहे. लोकल पोलीस ठाण्यात अलर्ट आला आहे की नाही हे विचारावे. गुप्तचर विभागाला अलर्ट आला आहे की नाही हे सर्व तपासून पाहावे. राज्यात आणि देशात 3 आणि 6 डिसेंबर नंतर दंगली घडणार असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला आहे.

‘उद्धव ठाकरेंना सांगताही येईना अन् सहनही होईना’; देसाईंची जळजळीत टीका

इंडिया आघाडीला जागेचा प्रस्ताव :
आम्ही युतीसाठी इंडिया आघाडीला जागेचा प्रस्ताव दिला आहे. लोकसभेच्या निवडणुका मार्च फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. समझोता होण्यासाठी आमचे पूर्णपणे प्रयत्न आहेत. पण राजकारण आहे काहीही घडू शकते, तेव्हा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्रभर जाहीर सभा घेत आहोत.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राज्यातील शेतकरी हा पुन्हा एकदा उठाव करण्याच्या परिस्थितीत आहे. हमी भावाच्या कायद्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर अॅग्रीकल्चर प्राईज कमिशनने जाहीर केलेल्या हमी भावाची अंमलबजावणी करणारा कायदा करणार असल्याची घोषणाही यावेळी आंबेडकरांनी केलीयं.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याआधी अनेकदा प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून आलं आहे. आत्ताही आंबेडकरांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. आंबेडकरांनी केलेला दावा कितपत खरा ठरेल हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube