Rohit Pawar : ‘प्रणितीताई या माझ्या मोठ्या भगिनी’ : शिंदेंवर पवारांची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
Untitled Design (19)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापूरच्या ( Solapur )  आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde )  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांवर ( Rohit Pawar )  टीका केली होती. त्याला आत रोहित पवारांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. प्रणितीताई शिंदे यांच्या वक्तव्याने नाराज झालेले कार्यकर्ते आपली प्रतिक्रिया देत आहेत. प्रणितीताई या माझ्या मोठ्या भगिनी आहेत. त्यांना मला रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आपआपसांत वाद न घालता आजचा बेरोजगारी हा मुख्य मुद्दा आहे, त्यावर आपण लक्ष देऊया, असे पवार म्हणाले आहेत.

तसेच सोलापूरच्या जागेचा प्रश्नावर दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते ठरवतील, मी फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनातीलभावना बोलून दाखवली, असे पवारांनी ट्विट केले आहे.

दरम्यान रोहित पवारांनी याआधी बोलताना सोलापूर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी केली होती. यावर बोलताना प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार?, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांची पहिली टर्म आहे त्यामुळे काहींमध्ये पोरकटपणा असतो, असे म्हणत रोहित पवारांना लक्ष केले होते.

 

शिंदे यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले असून त्यांनी सोलापूरमध्ये शिंदेंच्या कार्यालयाबाहेर आंदोलन देखील केले आहे. परंतु यावादावर रोहित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिल्याचे पहायला मिळते आहे.

Tags

follow us