Balasaheb Thorat : ‘साहेब व्यथीत झाल्याने…’ थोरातांच्या कन्या झाल्या भावूक

Untitled Design   2023 02 07T181254.708

मुंबई : ‘कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे व्यथीत झाल्यामुळे आम्हा सर्वांना वाईट वाटतं.’ अशी प्रतिक्रिया एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा व बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी दिली आहे. संगमनेर या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

त्याचबरोबर यावेळी त्यांना बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्या म्हणाल्या याबद्दल माझ्याशी काही चर्चा झाली नसल्याच त्यांनी म्हटलं आहे. तर बाळासाहेब थोरात हे व्यथीत झाल्यामुळे आम्हा सर्वांना वाईट वाटतं. आम्ही देखील व्यथीत होतो असंही त्या म्हणाले.

त्याचबरोबर यावेळी सत्यजित तांबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.’ तर बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘त्याबाबत मला काहीच माहित नाही.’ असं तांबे यांनी सांगितले आहे. ‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांवरती जर राजीनाम्याची वेळ येत असेल तर काँग्रेस पक्षाने याचा आत्मचिंतन करायला हवे.’ असेही सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us