सॅम पित्रोदा ५० दिवसांत पुन्हा ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या अध्यक्षपदी; भाजपकडून जोरदार टीका

सॅम पित्रोदा ५० दिवसांत पुन्हा ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या अध्यक्षपदी; भाजपकडून जोरदार टीका

Pitroda Again President Overseas Congress : सॅम पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी 50 दिवसांतच फेरनियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सततच्या वादग्रस्त वक्तव्यानं ते चर्चेत आले होते. (Sam Pitroda) दरम्यान, भविष्यामध्ये पित्रोदा कोणताही वाद निर्माण करणार नाहीत, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. तर, भाजपने यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ( Overseas Congress ) निवडणुकीमध्ये हे फक्त दाखवण्यापुरतं होतं, अशी टीका भाजपने केली आहे.

नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन अमेरिकेतून भारतात परतले; हिंदू राष्ट्राबद्दल केलं मोठं विधान

पित्रोदा यांनी भारतातील ईशान्येकडील नागरिक चिनी नागरिकांसारखे दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी भारतातील विविध राज्यांतील नागरिकांच्या दिसण्यावरून अशीच आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

मोदींनी वक्तव्यांचा विपर्यास केला

काँग्रेसनेही त्यांच्या विधानाशी सहमत नसल्याचें सांगत हात झटकले होते. हा वाद शमल्यानंतर आता पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज कांग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करत होते. त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

सॅम पित्रोदा कोण आहेत? नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन अमेरिकेतून भारतात परतले; हिंदू राष्ट्राबद्दल केलं मोठं विधान

सॅम पित्रोदा हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू आहेत. सत्यनारायण गंगाराम पित्रोदा म्हणजेच सॅम पित्रोदा यांना भारतातील टेलिकम्युनिकेशन क्रांतीचं जनक म्हटलं जातं. सरकारसोबत मिळून त्यांनी याबाबत मोठं काम केलं आहे. राजीव गांधी पंप्रधान असताना त्यांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सॅम यांनी कधीच गांधी कुटुंबाला एकटं सोडलं नाही.

मनमोहन सिंग यांच्यासोबतीह काम

सॅम पित्रोदा यांचा जन्म ओडिशाच्या टितलगड येथे गुजराती कुटुंबात झाला आहे. सॅम यांनी त्यांची व्यावसायिक कारकीर्द १९६० मध्ये अमेरिकेतून सुरू केली. भारतात काम करण्याच्या उद्देशाने त्यांचा संपर्क गांधी कुटुंबाशी आला. राजीव गांधी यांच्यासोबत काम करत असताना त्यांची गांधी कुटुंबाशी जवळीक निर्माण झाली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार म्हणूनही सॅम पित्रोदा यांनी काम केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज