कसब्यातील पराभवानंतर संजय काकडेंनी स्वतःची मान पुढे केली… मला शिक्षा करा!

कसब्यातील पराभवानंतर संजय काकडेंनी स्वतःची मान पुढे केली… मला शिक्षा करा!

पुणे :  कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासने यांचा पराभव केला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपाच बालेकिल्ला आहे. गेली 28 वर्षे याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येत होता. परंतु आता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी निवडून आले आहेत. भाजपच्या पराभवावर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवाला मी देखील जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कसब्यामध्ये आमचा नक्कीच पराभव झाला आहे. या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करु. मतमोजणीच्या एकुण 20 फेऱ्या झाल्या. त्यातील 6 फेऱ्यांमध्ये आम्हाला लीड आहे तर 14 फेऱ्यांमध्ये धंगेकर यांना लीड आहे. त्यामुळे आमचे कुठे चुकले याबाबत आम्ही आत्मचिंतन करु. या निकालावर आमच्या पक्षाची बैठक होईल. त्यात आम्हाला  लीड का मिळाला नाही यावर विचार करुन त्याचा रिपोर्ट करुन तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवू, असे ते म्हणाले आहेत.

Ravindra Dhangekar : ठाकरेंचे विश्वासू सहकारी ते काँग्रेसचे आमदार, धंगेकर यांचा प्रवास

तसेच नैतिकपणे मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. या पराभवाची  जबाबदारी स्वीकारुन मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकाळीच मेसेज केला व मला शिक्षा द्यावी, असे त्यांना म्हटले आहे. त्यांनी दिलेली शिक्षा मी आनंदाने स्वीकारील. याचे कारण पराभवाला कार्यकर्ते देखील जबाबदार असतात. मी देखील तितकाच या पराभवाला जबाबदार आहे, असे काकडे म्हणाले आहेत.

Kasba Bypoll रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

दरम्यान यानंतर कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी सुरुवातीपासून सांगत होतो की मीच निवडून येणार आहे. येथे सरळ दुरंगी लढत होती. या विजयानंतर मला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन केला. शुभेच्छा दिल्या. आता मी यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. तसेच मी सर्वात आधी भाजपचे खासदार गिरीश बापट यांना भेटणार, असे धंगेकर यांनी सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube