Sanjay Raut : बाळासाहेबांना सोडणारे पुन्हा राजकारणात दिसलेच नाहीत…
Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेले नेते पुन्हा राजकारणात दिसलेच नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत बोलत होते. (Sanjay Raut criticizes Shinde group MLAs)
नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्स बसची मोटार सायकलला धडक; तीन जण जागीच ठार
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंना जे नेते सोडून गेलेले आहेत, ते पुन्हा राजकारणात दिसलेले नाहीत हा इतिहास आहे. गद्दारांचं नामोनिशाणही कुठे दिसणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी बोलतना संजय राऊतांनी याआधीही शिवसेनेवर अनेकदा संकटे आल्याचं सांगितलं आहे. पण संकटात कधीही बाळासाहेब डगमगले नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय.
Shilpa Shetty: ‘अक्षय कुमारने माझा वापर..’, शिल्पा शेट्टीने केला होता गंभीर आरोप
देशभरात जनता पक्षाचा विस्तार होत असतानाच तेव्हाही शिवसेना जनता पक्षात विलीन करण्याबाबत नेत्यांनी सांगितल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय. त्यावेळी आता जनता पक्षच राहणार असल्याची परिस्थिती होती. अशा काळात मुंबई महापालिकेचे महापौर डॉ. गुप्ते यांच्यासह शिवसेनेचे इतर प्रमुख बाळासाहेबांकडे आले.
संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत
त्यावेळी त्यांनी आपण जनता पक्षात विलीन व्हावं, असं बोलणं बाळासाहेबांशी केलं होतं. त्यावर बाळासाहेबांनी ठामपणे उत्तर देत ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचंय त्यांनी जावं पण माझ्या चार दोन लोकांना सोबत घेऊन मी शिवसेना पुढे नेणार असल्याचं सांगितलं होतं, असं राऊतांनी स्पष्ट केलंय.
Jitendra Aawhad : पराभवापासून वाचण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच दंगली घडवतयं; आव्हाडांचा गंभीर आरोप
शिवसेना उभी करताना बाळासाहेबांनाही अनेक अडचणी आल्या होत्या. आणीबाणीच्या काळात शिवसेनेने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, यासाठी दबाव आणला जात होता. जर शिवसेना विलीन झाली नाहीतर आम्ही बंदी आणणार असल्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यावर ज्या क्षणी शिवसेनेच्या बंदी हुकुमावर पंतप्रधान सही करतील त्याक्षणी मुंबईत रजनी पटेलांची तिरडी काढल्याशिवाय राहणार नसल्याचं रजनी पटेलांना सांगितलं होतं, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.