Sanjay Raut यांचे मंत्री दादा भुसेंवर गंभीर आरोप, ईडीलाही केले टॅग
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केल आहेत. त्यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. राज्यात अनेकदा विरोधकांमागे विविध आरोपांखाली ईडीची चौकशी लावली जाते. असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तसेच भाजप विरोधकांविरोधात ईडीचा वापर केल्याचंही बोलंल जात. त्यामुळेच संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसेंवर आरोप करणारं ट्विट करताना ईडी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही टॅग केले आहे.
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले.
ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.@dir_ed@Dev_Fadnavis pic.twitter.com/fYuLIZEhEL— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2023
संजय राऊतांनी काय आरोप केले ?
संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केल आहेत. त्यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स गोळा केले आहेत. पण संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही एक मोठी लूट असून त्याचा लवकरच स्फोट होणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
Sanjay Raut : रक्तबंबाळ मुलीचा फोटो टाकण राऊतांना भोवलं; बार्शीत गुन्हा दाखल
संजय राऊतांच ट्विट नेमकं काय ?
‘हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडून गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स गोळा केले आहेत. पण संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही एक मोठी लूट असून त्याचा लवकरच स्फोट होईल.’ यामध्ये त्यांनी ट्विट करताना ईडी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही टॅग केले आहे.