रामभाऊ बीडवाले, अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरचा बॉस झोपला…; शरद पवार गटाची टीका

रामभाऊ बीडवाले, अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरचा बॉस झोपला…; शरद पवार गटाची टीका

Prashant Jagtap on Ram Satpute  : पुण्यातील हिट अँड रन (Pune Porsche Accident) प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांवरही आरोप करण्यात आले. त्यानतंर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांन (Devendra Fadnavis) पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेत दोन पबवर बंदी आणली. त्यावरून भाजपचे नेते राम सातपुतेंनी (Ram Satpute) माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) टीका केली. त्या टीकेला आता शरद पवार गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं.

कर्मचाऱ्यांना दिलासा! विशेषाधिकार रजेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

प्रशांत जगताप यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणाले, ‘रामभाऊ बीडवाले… हे अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सांगर बंगल्यावरचा बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् 100 + नगरसेवक झोपले होते का? की दोन निष्पापांचे बळी जाण्याची वाट पाहत होते? अनधिकृत पब बंद करणे हे काय पबजी खेळण्यासारखे आहे का?, असा सवाल जगताप यांनी केला.

पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांवर कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर फडणवीसांनी दोन अवैध पब बंद करण्याचे आदेश दिले होते. आता पुण्यातील अवैध पबवर बुलडोझर चालवण्यात येत आहे. कोरेगाव पार्कमध्ये बेकायदेशीरपणे बांधलेले पब पाडण्याचे काम सुरू झाले आहे. यासंदर्भात पोस्ट टाकून राम सातपुते यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

पहिल्या एफआयआरमध्ये योग्य कलमं का लावली नाही? या प्रकरणाची न्यायिक चौकशी करा; वडेट्टीवारांची मागणी 

राम सातपुतेंची टीका काय?
राम सातपुतेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले की, अनिल देशमुखजी,
याला गृहखाते सांभाळण म्हणतात. तुम्ही जर गृहमंत्री असतात तर पहिल्यांदा तुमच्या लाडक्या वाझे ला वसुलीला पाठवलं असतं या पब मालकांकडे, अशी टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज