Sharad Pawar यांनी बोलावली आमदारांची बैठक, आगामी निवडणुकांवर चर्चेची शक्यता
Sharad Pawar Meeting with MLA : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाचील आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता मुंबईतील वायबी चव्हाण येथे ही बैठक पार पडणार आहे.
आमदारांच्या माध्यमातून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न शरद पवार हे या आजच्या बैठकीतून करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची स्थानिक पातळीवरील तयारी आणि परिस्थिती कशी आहे. याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद हे आमदारांकडून जाणून घेतील.
‘भीती निर्माण होईल असं वातावरण तयार करू नका’; सप्रीम कोर्टाने ‘ईडी’ला सुनावले
कर्नाटक निवडणुकांनंतर महाविकास आघाडीने आगामी निवडणुका एकत्र लढायला हव्यात असं शरद पवारांना वाटतं. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण त्यावेळी राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांबाबत काहीही चर्चा त्यावेळी झाली नसल्याचं सांगण्यात येत होत. त्यामध्ये आता ही बैठक किती महत्त्वाची ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.