मुख्यमंत्र्यांना टिंगलटवाळीची भाषा शोभत नाही; राहुल गांधींवरून पवारांनी फडणवीसांना सुनावले !

Sharad Pawar- राहुल गांधीसंबंधी जे शब्द वापरले आहे, ते मला अयोग्य वाटले आहेत. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत.

  • Written By: Published:
Sharad Pawar (2)

Sharad Pawar On Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) ‘मोस्ट रिजेक्टेड’ माल अशी टीका केली होती. त्याला आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टिंगलटवाळीची भाषा शोभत नाही, असे म्हटलंय.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेंकडून सर्व पदांचा राजीनामा; विधान परिषद न मिळाल्याने नाराजीच्या चर्चा

पेट्रोल, डिझेल बचतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांना आवाहन केले होते. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. त्या टिकेला उत्तर देताना फडणवीस यांनी राहुल गांधींसाठी मोस्ट रिजेक्टेड माल अशी भाषा वापरली होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील सर्वाधिक नाकारलेली वस्तू आहेत. त्यांना सर्वत्र, प्रत्येक राज्यात नाकारण्यात आले. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना आशीर्वाद देत राहील. पुण्यात पत्रकार परिषद शरद पवार यांनी त्यावर फडणवीसांना उत्तर दिले आहे.


Video : इंधन बचतीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम; शाळा-कॉलेज ऑनलाईन तर, मंडे मेट्रो डे

पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मी पाहिले आहे. राहुल गांधीसंबंधी जे शब्द वापरले आहे, ते मला अयोग्य वाटले आहेत. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. तेही लोकसभेचे. त्यामुळे पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधित बोलणे टाळले पाहिजे आहे. गांभीर्याने बोलले आहे. मुख्यमंत्र्यांना टिंगलटवाळीची भाषा शोभत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला काही लोक प्रतिसाद देत आहे. हे किती दिवस टिकणार आहे ? एक-दोन दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. आजपासून देवेंद्र फडणवीस मोटारसायकलवर आले आहे. उद्यापासून मोटारसायकलवर दररोज आले नाहीत, तर काही फरक पडणार नाही. ताफा सोडणाऱ्यांना दिखावा करू नये, सातत्य दाखवावे. निवडणुकीच्या काळात देशाच्या नेतृत्वाला गांभीर्य नव्हते, अशी टीकाही शरद पवार यांनी केलाय.

follow us