तुम्हाला तडीपार केलं होतं अन् तुम्ही … शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर
Sharad Pawar On Amit Shah : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुण्यात अधिवेश पार पडले. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी बोलताना अमित शहा यांनी शरद पवार (Sharad Pawar) हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहे. असं म्हटले होते. याच बरोबर शरद पवार यांनी देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण केले असल्याचा आरोप देखील केला होता. तर आता शरद पवार यांनी देखील या टीकेला प्रत्युत्तर दिला आहे. आज शरद पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 400 पेक्षा जास्त जागा द्या असं म्हणत होते मात्र या देशाच्या जनतेने या लोकसभा निवडणुकी भाजपला धडा शिकवला. मात्र तरीही देखील ज्या लोकांच्या हातात या देशाची सत्ता आहे त्यांच्या विचारात कोणताही बदल झालेला नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर आरोप लावले. त्यांनी म्हटले की, देशात जितके भ्रष्टाचारी आहे. त्यांचा मी सरदार आहे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहे. जेव्हा तुमच्या हातात गुजरातची सत्ता होती तेव्हा तुम्हाला सत्तेचा दूरउपयोग केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं होतं. ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं होतं तो व्यक्ती आज देशाच्या सुरक्षेबद्दल बोलत आहे. अशी टीका शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केली.
काय म्हणाले होते अमित शाह
पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात बोलताना अमित शाह म्हणाले होते की, शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहे. शरद पवार यांनी देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण केले आहे.
व्हॅन चालक ठरला ‘हिरो’, गाडी चालवताना आला हृदयविकाराचा झटका तरीही वाचवले 20 मुलांचे प्राण
मी शरद पवारांना सांगायला आलो आहे की, जेव्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतो मात्र जेव्हा शरद पवार यांच्या महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येते तेव्हा राज्यात मराठा आरक्षण संपते. असं अमित शाह म्हणाले होते.