जे झालं त्याची चिंता नाही, उद्या जाहीर सभा, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी थोपटले दंड…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीननंतर अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले असल्याचं दिसून येत आहे. उद्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यात घडलेल्या महाभूकंपानंतर शरद पवारांनी नूकतीच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी आपली भूमिका वेगळीच असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पवार म्हणाले, अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मला देशभरातून अनेक नेत्यांचे फोन आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. आज जे काही झाले त्याची मला चिंता नाही. उद्या मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वाय.बी.चव्हाण यांचे आशीर्वाद घेऊन जाहीर सभा घेणार असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे.
Video : डबल इंजिन सरकारला अजितदादांचे तिसरे इंजिन; शिंदेंकडून राष्ट्रवादीचे सरकारमध्ये स्वागत
आज सकाळपासून राज्याच्या घडामोडींना चांगलाच वेग आला होता. विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करुन मला संघटनेत काम करण्याची इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती. त्याआधीच शरद पवार यांनी राजकारणातून मुक्त होत राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत पक्षात भाकरी फिरवणार असल्याचं जाहीर केलं.
मणिपूर हिंसाचारामध्ये धुमसत असतांना पंतप्रधान मोदी गप्प का? राज ठाकरेंचा सवाल
त्याचवेळी अजित पवारांनी मला संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट केलं होतं. यावर निर्णय होण्याआधीच प्रदेशाध्यपदासाठी अजित पवार इच्छूक असल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर आज सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह आमदारांची बैठक घेतली होती.
Buldhana Bus Accident : शिंदे-फडणवीसांनी थार गाडीमध्ये बसून ड्रामा केला; जलील यांच्या हल्लाबोल
बैठकीनंतर अजित पवारांसमवेत दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे यांनी थेट राजभवन गाठत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस आदी उपस्थित होते. याचदरम्यान, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या हालचाली सुरु पाहायला मिळाल्या होत्या, अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मंत्रिपदाची आस लावून बसलेले असतानाच मोठा भूकंप घडलाय. आता राष्ट्रवादीच्या आमदारांनाही मंत्रिपदे मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुढील काळात राजकीय घडामोडींमध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.