Dhairyasheel Patil join BJP : शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजप प्रवेश !

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 02 28T175420.418

मुंबई : शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील (Dharisheel Patil) हे भाजपात आले आहेत. यानंतर धैर्यशील पाटील यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कौतुक केलं आहे. धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसेच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करत असतात. मी मुख्यमंत्री असताना काही प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आले होते, जनतेत राहून जनतेची कामं करणं याविषयी गत्यांनी सतत महत्त्वाचं दिल आहे. धैर्यशील पाटील भाजपात असले पाहिजेत असं आम्हाला वाटत होतं आणि त्यांचा प्रवेश झाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हणाले.

धैर्यशील पाटील हे फक्त राजकारणाकरिता राजकारण करणारे नाहीत. तर समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारे आहेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. आपले प्रश्न धडाडीने धैर्यशील पाटील मांडत असत. धैर्यशील पाटील यांनी कायमच समाजाभिमुख राजकारण केलं. तळगाळात त्यांच्या लोकांच्या प्रश्नांसाठी ते सतत लढा दिला आहे. आज देशाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचं नेतृत्त्वही असाच विचार करणारं आहे. यामुळे मी हे सांगू इच्छितो की धैर्यशील पाटील यांनी पक्ष बदलला असला, तरी देखील त्यांचा विचार बदलेला नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे.

ठाकरेंची गाडी पुन्हा ‘वर्षा’वर न्यायची, नगरमधील ‘या’ बड्या नेत्याचं विधान

त्याविषयी मी त्यांचं स्वागत करतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हंटल आहे. महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याअगोदरच महाविकास आघाडीला जितकं कमकुवत करता येणार आहे, तितकं करण्याचा प्रयत्न भाजप पक्षाने सुरू केला. महाविकास आघाडीचे आजी- माजी आमदार आपल्याकडे ओढण्याकरिता भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. आज शेकापच्या धैर्यशील पाटील यांनी केलेला प्रवेश हेच सांगून जात आहे.

मुंबई भाजपाच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाचा गमछा धैर्यशील पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. रायगड पालीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि शेकापचे दिलीप भोईर यांनी याअगोदर भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर आता धैर्यशील पाटील हे देखील भाजपात आले आहेत. यामुळे रायगडमधला शेतकरी कामगार पक्ष कमकुवत झाला.

Tags

follow us