शिवसेना खरी कोणाची? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं…

शिवसेना खरी कोणाची? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं…

Supriya Sule On Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात राजकारण चांगलच ढवळून निघालं. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता ठाकरे(Thackeray) आणि शिंदे(Shivsena) गटात जोरदार चुरस सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

”…मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते का?”

या संपूर्ण घडामोडीनंतर आता शिवसेना पक्ष नेमका कोणाचा? यावरुन वादंग पेटलेलं आहे. अशातच आता शिवसेना पक्ष कोणाचा? याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी परखडपणे भाष्य केलं आहे. माझ्यासाठी शिवसेना एकच ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची , असं सुप्रिया सुळेंनी(Supriya Sule) स्पष्ट केलं आहे. अहमदनगरमध्ये सुळे बोलत होत्या.

अभिनेत्री करिश्मा तन्नाचा साडी स्वॅग, दक्षिण कोरियात टिपले सुंदर फोटो

सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकं म्हणतात की हा गट तो गट अययं…माझ्यासाठी शिवसेना एकच.., ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी कष्टाने उभी केलेली. त्यांनी हयात असतानाच स्वत:च्या पोराला दिलीयं, शिवसेना दुसऱ्या कोणाची नाहीये, असं कोणीही येईल अन् टपली मारुन जाईल चालतयं का? या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टोलेबाजी केली आहे.

सिनेमागृहांना इंग्रजी सबटायटल्सचे वावडे; ‘आत्मपॅम्फ्लेट’दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

तसेच यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. सुळे म्हणाल्या, तुमची वडिलोपर्जित असलेली शेती मी घेऊन जाऊ का? तुमचे वडील माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्या नावावर कराल का? मी ती घेऊन जाऊ का? नाहीतर मी अदृश्य शक्तीला सांगेल…, या शब्दांत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

‘त्या’ दिवशी पोलिसांवर दगडफेकीचा ब्रेन ‘टोपेंचा’ होता; पवारांच्या शिलेदारावर फडणवीस प्रतिष्ठानचे आरोप

‘त्या’ जीआरची आम्ही होळी करु :
2024 साली सत्तेत आल्यानंतर आम्ही मंत्रालयासमोर जळगावच्या कंत्राटी कामगारांच्या जीआरची होळी करणार असून खोके सरकारने बंद केलेली शाळा आम्ही पुन्हा सुरु करणार असल्याचं सुळे म्हणाल्या आहेत.

शाळा बंद करुन दारु सुरु करताय, पक्ष फोडायला त्यांच्या पैसे आहेत, पण नांदेडच्या रुग्णालयात औषधे आणण्यासाठी पैसे नाहीत, 12 मुलं गेली पण सरकार क्लीन चीट देतयं अन् सरकार म्हणतयं कोणाची चूक नाही, देशात लोकशाही नाही दडपशाही सुरु झाली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube