जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या खासदारांचे गुपित फोडले…..

जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या खासदारांचे गुपित फोडले…..

Shiv Sena MPs used to contest elections on BJP tickets; Statement by Jayant Patil : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय युती, आघाडी केलेल्या प्रमुख पक्षांनी आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा येतील, याचे आखणी करायला सुरू सुरूवात केली. 2024 ची लोकसभा निवडणुक महाविकास आघाडीसह भाजप आणि शिंदेसाठीही महत्वाची आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं.

https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची नाही. शिंदेच्या सोबत असलेल्या बऱ्याच खासदारांना आगामी लोकसभा निवडणुक ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे, असं खळबळजनक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.

जीवे मारण्याच्या धमकीनंतर राम शिंदेंचे रोहित पवारांकडे बोट, ‘असे राजकारण कर्जत-जामखेडमध्ये…’

पाटील म्हणाले, शिंदे गटाच्या खासदारांना भाजपच्या तिकीटावर खासदारकी लढवायची आहे. त्यामुळं शिंदे गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, भाजपच्या तिकिटावर शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक लढवली तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंसोबत परतण्याची शक्यता असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काल दिल्लाीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांत वाद झाले. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, देशाच्या इतिहासामध्ये जगामध्ये या महिला खेळाडूंनी कुस्तीपटूनी विशेष कामगिरी बजावली, सुवर्णपदक मिळवले. वेगवेगळ्या खेळात पदके मिळालेल्या महिला खेळाडूंना रस्त्यावर खाली पाडून त्यांच्या तोंडावर पोलीस बुटाचे पाय ठेवतात ही निर्घृण आणि अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. त्या महिला खेळाडू इतके दिवस आंदोलन करत आहेत त्यांचे आंदोलन चिरडून टाकणे हा निषेधार्ह प्रकार आहे. देशातील सत्ता ज्यांच्या हातात आहे ते किती असंवेदनशील झाले, याचाचा हा पुरावा असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube