Maharashtra Politics : …म्हणून अमोल कोल्हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले, अजित पवारांनी स्पष्ट केले

Maharashtra Politics : …म्हणून अमोल कोल्हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले, अजित पवारांनी स्पष्ट केले

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत 15 दिवस अगोदर बैठक मुख्यमंत्री यांनी घ्यायची असते. कुठले प्रश्न महाराष्ट्राचे असावेत ? याबाबत पुस्तिका काढली जाते. परंतु मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी ही बैठक घेतली. त्यामुळे आमचे खासदार या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. पण मुद्दामहून कुणी टाळले नाही. डॉ. अमोल कोल्हे मुंबईत होते. म्हणून ते बैठकीला गेले. बाकीचे खासदार दिल्लीत होते. असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. की, खासदार अमोल कोल्हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला का गेले ? यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत मात्र आता अमोल कोल्हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले. मात्र महाविकास आघाडीच्या खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावरून पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत.

संसदेच्या बजेट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. राज्यातले महत्वाचे प्रश्न संसदेत मांडले जावेत यासाठी दरवर्षी या बैठकीची प्रथा आहे. या बैठकीला महा आघाडीच्या खासदार यांनी गैरहजेरी लावली. पण राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावत, सध्या आपल्याला राष्ट्रवादी पेक्षा भाजप जवळ असल्याचे संकेत कोल्हे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र मधील प्रश्नासाठी ही बैठक बोलावली गेली. पण प्रश्न पेक्षा बैठक अमोल कोल्हे यांच्या उपस्थिती मुळे गाजली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे , काँग्रेस चे बाळू धानोरकर, सेनेचे विनायक राऊत, राजन विचारे, खासदार अरविंद सावंत यांच्या सह राज्यसभा सदस्य शरद पवार, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, अनिल देसाई, प्रियांका शर्मा या सर्व खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube