Balasaheb Thackeray : …म्हणून नारायण राणेंनी मानले अजित पवारांचे आभार
मुंबई : शिवसेनाप्रमुख पदाशिवाय बाळासाहेबांची ओळख ही महाराष्ट्रात अपूर्ण आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावर काय आहे. काहींनी मला सांगितलं की, त्यावर हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहिन्यात आलं आहे. असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं.
त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘अजित पवार यांनी बाळासाहेबांबद्दल अतिशय चांगले विचार त्यांनी मांडले. त्यांचा आभारी आहे. बाळासाहेबांच्या सहवासात राहिलेल्यांनी त्यांच्या बिरूदावलीबद्दल बोलावं.’ पुढे अजित पवार म्हणाले की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहिन्याऐवजी शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहिन्यात यावं.
मुंबईतील माटुंगा येथे ष्णमुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच अनावरण करण्यात आलं. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे.
तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी राज्यभरातील तमाम शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती निलम गोर्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबादास दानवे यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे खासदार, आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते.
या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांना हजेरी लावली होती. दरम्यान, यावेळी ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले आहे. यावेळी अनेक नेत्यांनी बाळासाहेबांबद्दल आपले विचार मांडले.