राऊतांना भुजबळांनी फटकारले; ‘अशानं वज्रमूठीवर लोकांचा विश्वास उरणार नाही’
…So people will not have faith in, advice to sanjay Raut from chhagan Bhujbal : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यावर संजय राऊत यांनी धरणात मुतण्यापेक्षा थुकणं बरं, असा खोचक टोला केला होता. दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यांनी राऊतांना फटकारले.
संजय राऊत यांच्या थुंकण्याचा कृतीवर अजित पवार यांनी भाष्य करतांना सांगितलं होतं की, संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलतांना संयम बाळगला पाहिजे. पवारांच्या या वक्तव्यावर राऊतांनी धरणात मुतण्यापेभा थुंकणं चांगलं, असं प्रत्युत्तर दिलं. याविषयी छगन भुजबळ यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, महाविकास आघाडीत आपण एकत्र आहोत. एकमेकांबद्दल शेरेबाजी करणं टाळलं पाहिजे, असं भुजबळ यांनी सांगितलं.
ते म्हणाले, आपण एकत्र लढत आहोत. आणि एकत्र लढत असतांना आपल्यामध्येच फूट आहे, असा मेसेज लोकांमध्ये गेला तर, तर महाविकास आघाडीच्या ऐक्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे बोलताना सावधगिरी बाळगावी, नाहीतर वज्रमूठीवर लोकांचा विश्वास उरणार नाही, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.
तोकड्या कपड्यांना मंदिरात ‘No Entry’…तरुणी म्हणतायत…
दैनिक सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर टीका केली आहे. या अग्रलेखात त्यांनी मोदींची तुलना स्टॅलिनशी केली. यावरही भुजबळ यांनी भाष्य केलं. संजय राऊत यांच्या बद्दल मी बोलणे योग्य नाही.. त्यांनी पंतप्रधान स्टॅलिन सोबत का तुलना केली हे माहिती नाही, असं भुजबळ म्हणाले.
मी भाजपची पण, भाजप थोडीच माझी आहे, मी वादळाची लेक आहे, अशी वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यावर भुजबळ बोलले. पंकजा मुंडे बाबत मी वर्तमान पत्रात वाचलं. त्यांच्या मनात दुःख आहे. भाजप बाजूला करत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या मोदी आणि शहा यांना भेटणार आहे. हा योग्य मार्ग आहे, असं ते म्हणाले. पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का, असं विचारल्यावर भुजबळ म्हणाले, त्या राष्ट्रराष्ट्रवादीत येणार का याची मला कल्पना नाही, त्या येतील अस वाटत नाही, असं भुजबळ यांनी सांगितलं.