बीआरएसचे महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्के; केसीआरच्या भाजपसह कॉंग्रेस नेत्यांना भेटी

बीआरएसचे महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्के; केसीआरच्या भाजपसह कॉंग्रेस नेत्यांना भेटी

K. Chandrashekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR)हे आपल्या मंत्रिमंडळासह, आमदार, खासदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra)दौऱ्यावर आले आहेत. तेलंगणानंतर आता महाराष्ट्रात बीआरएसचा (BRS)विस्तार करण्यासाठी राव यांनी मोठा जोर लावला आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांमधील असंतुष्ट नेत्यांना साद घालताना दिसत आहेत. महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्याच दिवशी बीआरएसचे अर्थमंत्री हरीश राव, तेलंगणाचे उत्पादन शुल्क आणि क्रीडा पर्यटनमंत्री श्रीनिवास गौड यांनी सोमवारी सायंकाळी भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या निवासस्थानी नागेश वल्याळ (Nagesh Valyal)यांची भेट घेतली. त्याचबरोबर कॉंग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांची केसीआर यांनी भेट घेतली. केसीआर यांच्या या भेटीसत्रामुळे राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. (solapur-politics-kcr-meet-congress-and-bjp-leader)

एसटी बॅंकेवर झेंडा फडकावताच सदावर्तेंकडून नथुराम गोडसेंच्या समर्थनात घोषणा…

बीआरएसचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर भेटी घेत असल्याने अनेक राजकीय पक्षांनी त्यांचा धसकाच घेतला आहे. बीआरएस म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आलेलं मोठं वादळ असल्याचीच प्रचिती येत आहे.

World Cup 2023: अहमदाबादमध्ये फायनल, तर या 12 शहरांमध्ये होणार वर्ल्ड कपचे सामने

बीआरएसने सध्या सोलापूर जिल्ह्याला लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरमधील राजकीय वातावरणात हस्तक्षेप केल्यामुळे कॉंग्रेस, भाजपसह राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरल्याचं पाहायला मिळत आहे. बीआरएसच्या सोलापुरात झालेल्या आगमनामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांमधील चित्र काहीतरी वेगळंच दिसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

त्यातच सोमवारी सोलापुरातील माजी खासदार स्व. लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आणि भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी बीआरएसच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. बंद दरवाजाआड ही बैठक तब्बल अर्धा तास चालली, मात्र या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

त्यामुळे आता वल्याळ बीआरएसची वाट धरणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आपले तेलंगणाच्या मंत्रिमंडळात पाहुणे आहेत, त्यामुळे ते भेट घेण्यासाठी आले होते, आपण भाजप सोडून जाणार नसल्याचे वल्याळ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube