विधानपरिषद निवडणूक : भाजपकडे मजबूत आकडे पण दिग्गजांच्या फिल्डिंगमुळे पालकमंत्री गोरेंच्या डोक्याला भुंगा !
Vidhan Parishad Election-बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक माजी आ. राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.
Solapur Vidhan Parishad Election: सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी ( Vidhan Parishad Election) भाजपकडे मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे येथून भाजपचा उमेदवार सहज निवडून येईल. तर महाविकास आघाडीकडे अंत्यत कमी संख्याबळ आहे. त्यांच्याकडे शंभरपेक्षा कमी सदस्य आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार मैदानात असेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये कस लागणार आहे कारण अनेक बडे नेते हे इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे. अनेक इच्छुकांमुळे उमेदवार ठरविताना पालकमंत्री जयकुमार गोरे (JayKumar Gore) यांची कसोटी लागणार आहे.
मी फरार नाही, कायदा पाळणारा माणूस आहे”; अटकेनंतर विकास लवांडेंची संतप्त प्रतिक्रिया, पोलिसांवर गंभीर आरोप
भाजपकडे संख्याबळ सर्वाधिक
सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 501 सदस्य आहेत. त्यात महायुतीमध्ये भाजपकडे सर्वाधिक 262 सदस्य आहेत. शिवसेनेकडे 71 आणि राष्ट्रवादीकडे 47 सदस्य आहेत. तर महाविकास आघाडीकडे केवळ 70 सदस्य आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 27, काँग्रेस 19, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 34 असे एकूण फक्त 70 संख्याबळ आहे. अपक्ष चार आणि स्थानिक आघाडीचे 47 सदस्य आहेत. त्यामुळे या जागेवर महायुतीकडे संख्याबळ आहे. भाजपकडे सर्वाधिक सदस्य आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजप लढणार आहे.
पेट्रोल पंपावर गर्दी वाढली; CM फडणवीस म्हणाले, काहीतरी गडबड अन्…
इच्छुक अनेक जण
मागील वेळी भाजपचे प्रशांत परिचारक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तेही पुन्हा इच्छुक आहेत. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आ. राजन पाटील,माजी आमदार राम सातपुते आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही माजी आमदार पारिचारक व राजेंद्र राऊत यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच आहे. कारण पारिचारिक यांनी पक्षासाठी दोन वेळा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. परंतु माजी आमदार राजेंद्र राऊत व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एकाच विमानातून प्रवास केला आहे. ते दोघेही मुंबईला गेले होते. पण राजेंद्र राऊत यांच्यासमोर एक अडचण आहे. कारण राऊत यांचे समर्थक दीपक वैद्य हे झेडपी अध्यक्ष झालेले आहे. त्यामुळे राऊत यांच्या उमेदवारीबाबत विरोधही होऊ शकते.
पालकमंत्री जयकुमार गोरे कुणाला अनुकूल राहणार ?
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. त्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे हे सारे सूत्र असणार आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांचीही एक नाव निश्चित करताना कसोटी लागणार आहे. त्यात जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल, असंही म्हटलंय.