Sunil Kedar : जान जाए पर वचन न जाए, 50 खोक्यांचा विषयी कायमचा संपवायचा

Untitled Design   2023 04 16T223248.395

Suni kedar ON BJP and Eknath Shinde : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राज्यातील सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ भव्य सभा झाली आहे. या सभकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. या सभेत महाविकास आघाडीच्या तिनही पक्षाच्या नेत्यांनी हजरी लावली होती. या सभेत बोलतांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला. यावेळी कॉंग्रेसचे नेते आणि वज्रमुठ सभेचे समन्वयक असलेले सुनील केदार (Sunil Kedar) यांनी जान जाए पर वचन न जाए, गद्दारी हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून आता 50 खोक्यांचा विषय संपवायचा, असा शिंदेगटावर निशाणा साधला.

एकनाथ शिंदेनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत मोठं बंड केलं. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. परिणामी, ठाकरे सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर ठाकरे गट चांगलाच सक्रीय झाला. या सत्तांतरानंतर शिंदे गटाच्या नेत्यावर कायम गद्दार… गद्दार… पन्नास खोके, एकदम ओके, अशी टीका होत असते. आजही नागपूरच्या सभेत बोलतांना सुनील केदार यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. यासभेला संबोधित करतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाजांच्या कर्तृत्वाने या महाराष्ट्राला जगात एक ओळख निर्माण करून दिली. पण, आज या महाराष्ट्राला काळीमा लावण्याची कृती दहा महिन्यांपूर्वी झाली. शिंदे गट खोक्यांनी विकला गेला. या देशातील मराठी माणूस हा आपल्या स्वार्थापोटी खोक्यांनी विकल्या जात आहे, हे दुर्दैव आहे. मात्र, जान जाए पर वचन न जाए, गद्दारी हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून आता 50 खोक्यांचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे, असं केदार म्हणाले.

अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी सरकार एक्शन मोडमध्ये, 17 पोलीस केले निलंबित

केदार म्हणाले की, नागपुरमध्ये आजच्या सभेनंतर जे वातावरण तयार होणार आहे. ते देशाला ढवळून टाकणारं वातावरण तयार होणार आहे. 14 एप्रिल नुकतीच झाली. 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आपण मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. 75 वर्षापूर्वी जेव्हा देश स्वतंत्र झाला होता, तेव्हा देशातील सगळ्या जातीपातींना एकत्र बांधून बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना लिहिली होती. पण, 2017 नंतर देशात भाजपने हे संविधान जाळून टाकलं होतं. जे संविधान जाळतात, त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही, अशी शब्दात भाजपवर टीका केली. सध्याचं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

 

Tags

follow us