Supriya Sule vs Chitra Wagh : ताईंवर, आई-वडिलांचं मत चिमुरड्यांकडे मागण्याची वेळ आलीये…?

Supriya Sule vs Chitra Wagh : ताईंवर, आई-वडिलांचं मत चिमुरड्यांकडे मागण्याची वेळ आलीये…?

मुंबई : ‘काय वेळ आलीये..?, ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुरड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ @supriya_sule ताईंवर आलीये…? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती.. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर…’ अशी टीका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

ही टीका चित्रा वाघ यांनी ट्विट करत केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एका शाळेमध्ये लहान मुलांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सुप्रिया सुळे या लहान मुलांना सांगतात की, ‘मी तुमचा खासदार आहे. तुमच्या आई-वडिलांनी मला मतदान केलं आहे का ? जर केलं नसेल तर 2024 ला तुमच्या आई-वडिलांना मला मतदान करायाला सांगा.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

त्यावरून भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींची काळजी वाटत होती. आता मात्र सुप्रिया ताईंवर लहान मुलांकडे त्यांच्या आई-वडिलांचे मत मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदींची काळजी करण्याची गरज नाही खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये. असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube