या सगळ्याचे स्क्रिप्ट रायटर फडणवीस; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 19T153813.241

Sushma Andhare On Devendra Fadanvis :  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे.

Ajit Pawar : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील आपत्ती सरकार निर्मित, अजित पवारांचं सरकारला पत्र

अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे.  या सगळ्यामध्ये  फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते. या सगळ्याचे  स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

-या निमित्ताने शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत.  त्यांचे सध्याच्या  घडामोडीवर स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात, असे दिसते आहे.  तसेच आमची महाविकास आघाडी अभेद्य आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजप कडून हे केले जात आहे. पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणे थांबणार नाही. मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत, असे अंधारे म्हणाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube