फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस; ठाकरे गटाची बोचरी टीका

फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस; ठाकरे गटाची बोचरी टीका

Sushama Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) कायम आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपवर (BJP) टीका करत असतात. त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) भाजपच्या अनेक नेत्यांवर बोचरी टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. देवेद्र फडणवीस हे पपेट ऑफ RSS असल्याची टीका त्यांनी केली. (Sushama Andhare On Devendra Fadnavis they said Fadnavis is a puppet of RSS)

आज बोलतांना अंधारे म्हणाल्या, फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कळसूत्री बाहुली आहेत. त्यांना गोळवलकरांना महापुरुषांच्या यादीत आणून बसवायचे आहे, अशी टीका त्यांनी केली.

संभाजी भिडे हे सतत महापुरुषांवराविषयी अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधाने करत असतात. यावरूनही अंधारेंनी भाजप नेत्यावर टीकास्त्र डागलं. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर कलंक म्हणून टीका केली. त्यावेळी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड हे नेते तुटून पडले होते. आता महापुरुषांचा अवमान सुरू केला जातो. मात्र, हे नेते काही बोलतांना दिसत नाहीत हे नेते कुठे लपलेत? असा सवाल अंधारेंनी केला.

मणिपूरमधील सद्यस्थिती नेहरु अन् काँग्रेसमुळेच! नॉर्थ ईस्ट आमच्या काळजाचा तुकडा : PM मोदींची टीका 

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांचे कौतुक केले. यावरही अंधारेंनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, हा प्रकार म्हणजे उंदराला मांजर साक्ष असा आहे. हेच मुख्यमंत्री भाजपसोबत राहू शकत नाही, असा दावा करायचे. याच अजित पवारांनी उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जात असल्याची टीका भाजपवर केली. आता तेच अजित पवार शाहांचे कौतुक करतात. त्यामुळं हे लोक आधी खरे होते की आता खरे आहेत असा प्रश्न पडतो.

श्रीकांत शिंदे आणि भाजप आक्रस्ताळेपणा करतात. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा म्हणूनन प्रश्न सुटणार आहेत का? मलाही हनुमान चालिसा येतो, असं त्या म्हणाल्या. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट, संजय बांगर, किशोर पाटील, अब्दुल सत्तार या लोकांचा उर्मटपणा हेच एकमेव क्वालिफिकेशन आहे. सध्या ते त्यांची ओरीजनल क्वालिटी दाखवत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी स्मृती इराणी यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या की, स्मृती इराणी सोयीस्कर राजकारण करतात. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगाना निर्भया प्रकरणावरून साडीचोळीचा आहेर पाठवला होता. मग आता त्या मणिपूरच्या मुद्दारून नरेंद्र मोदी सरकारला आहेर पाठवणार का? असा सवाल त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube