Tanaji Sawant यांना उस्मानाबादचा नेता व्हायचंय… म्हणून राणा पाटील निशाण्यावर

  • Written By: Published:
Tanaji Sawant यांना उस्मानाबादचा नेता व्हायचंय… म्हणून राणा पाटील निशाण्यावर

अशोक परुडे

राज्यात शिंदे गट व भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत असले तरी उस्मानाबादमध्ये मात्र भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil), शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यात मात्र आता बिनसलं आहे. दोघेही एकमेंकाना आता डिवचू लागले आहेत. राणा जगजीतसिंह पाटील, त्यांचे वडील पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व जिल्ह्यात राहिले आहे. त्यात शिवसेनेने या जिल्ह्यात सुरुंग लावलेला आहे. आता उस्मानाबादचे (Usmanbad पालकमंत्री व आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आता वरचढ ठरत आहे. सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जवळ असल्याने ते बेधडक बोलू लागले आहेत. पालकमंत्री सावंत यांचे राजकीय मांडलिकत्व राणा यांनी स्वीकारावे का असा मुद्दा आहे. तसेच जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व कोणाकडे हा वाद याच्या मुळाशी असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे थेट पाटील कुटुंबावर टीका करत आहेत. ते पाटील घराचे नाव घेत नसले तरी त्यांचा निशाण्यावर राणाजगजीतसिंह हे असल्याचे दिसून येत आहे. कोणाला काय वाटते, त्याला मी भीक घालत नाही, मला त्याच काही देणे घेणे नाही. नुसते बोलणे वेगळे असते. गेली 30-40 वर्ष जिल्हा मागास ठेवला, सत्ता होती ना तुमच्याकडे, त्यावेळी काय केले असा प्रश्न उपस्थित केला. मोठे व खोट रेटून बोलायचे जनतेची प्रगती होऊ द्यायची नाही. लोक माझ्यामागे राहतील की नाही ? या भीतीमुळे प्रगती व विकास करायचा नाही, असे म्हणत सावंत यांनी राणा यांनी डिवचले आहे.

Bihar Politics : शिवसेनेनंतर जनता दलातही फूट! भाजप बिहारमध्ये नितीश कुमारांनाही धक्का देणार ?

पण या दोघातील वादाची ठिणगी ही जिल्ह्या वार्षिक नियोजन समितीचा असमतोल निधी वाटपावरून झालेली आहे. आमदार राणा पाटील यांनी सावंत यांची थेट लेखी तक्रार प्रधान सचिवांकडे केली आहे. तर याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडेही राणा यांनी तक्रार केली. राणा यांनी थेट राजकीय टीका केली नाही. पण सावंत यांनी थेट राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

हा वाद म्हणजे केवळ निधीवाटप नाही. त्याला किनार जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे असावे, यावर आहे. पद्ममसिंह पाटील, राणाजगजीतसिंह पाटील हे उस्मानाबादमधील बलाढ्य राजकारणी. राष्ट्रवादीमध्ये असताना पद्मसिंह पाटील हे मंत्री राहिले आहेत. त्यांचा मुलगा राणाजगतीसिंह पाटील हे मंत्री राहिलेले आहेत. परंतु राजकीय धक्के बसल्याने राणाजगजीतसिंह पाटील हे भाजपमध्ये गेले. आमदारही झाले. स्थानिक राजकारणात वर्चस्व आहे. त्यात चुलत भाऊ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निशाणावर पाटील कुटुंब असते.

आता पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार जगजीतसिंह पाटील यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा-वाशी या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. सावंत हे मूळचे उस्मानाबादचे नाहीत. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात साखर कारखाना आहे. सावंत हे उस्मानाबादमधून आमदार झाले. मंत्री झाले आहे. पाटील घराण्याचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात सावंत यांनी आपले राजकीय वजन वाढविले आहे. त्याचाही वाद या दोघांतील संघर्षामध्ये आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांचे वर्चस्व, त्यात सावंत यांचे वजन जिल्ह्यात वाढू लागले आहेत. ही पाटील कुटुंबासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube