तानाजी सावंत यांचा डोळा विखे यांच्या पालकमंत्री पदावर
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांनी आपल्या मंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद (Guardianship)हवे होते ते मिळाले नसल्याची नाराजी त्यांनी सर्वांसमोर बोलून दाखवली आहे. एका भर कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion)होण्यापूर्वीच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदं आणि खात्यांच्या वाटपावरुन तानाजी सावंत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सोलापूर (Solapur)जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde group) आणि भाजपमध्ये (BJP)वादाची ठिणगी पडली आहे. आपल्याला सोलापूरचं पालकमंत्रिपद हवं होतं पण धाराशिव (Dharashiv)आणि परभणीचं पालकमंत्रिपद दिल्याचं तानाजी सावंत म्हणाले. आता सोलापूरचे पालकमंत्रिपद भाजपचे राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखेंच्या(Radhakrushn Vikhe) पालकमंत्रिपदावर शिंदे गटाचे तानाजी सावंत यांचा डोळा असल्याचं समोर आलं आहे.
Pune News : सहायक पोलिस आयुक्त घनवट यांच्यावर १२.५ लाखांच्या खंडणीचा गुन्हा!
तानाजी सावंत म्हणाले की, आपल्याला सोलापूरचे पालकमंत्री हवे होते, मात्र परभणी आणि धाराशिवचे पालकमंत्रिपद दिले आहे. त्याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्रिपद दिल्यानेही तानाजी सावंत नाराज होते असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आपल्याला आरोग्य खातं पसंत नव्हतं अशी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला टाळाटाळ करत होतो असंही त्यांनी सांगितलं आहे.
सावंत म्हणाले की, आपण निधी देऊ शकतो हे सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे. जर निधी मिळत नसेल तर भैरवनाथ साखर कारखाण्यातून पैसे देऊ असंही मंत्री तानाजी सावंत म्हणाले. आपण सोलापूरचे पालकमंत्री असतो तर या डीपीडीसीमध्ये तानाजी सावंत जिल्ह्यासाठी काय देऊ शकतात, हे दिसलं असतं, असंही ते म्हणाले. त्यामुळे आता सोलापूरच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या कार्यक्षमतेवरच तानाजी सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे यावर नेमकी काय प्रतिक्रीया देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सावंत म्हणाले की, अद्यापही वेळ गेलेली नाही पाहू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचार करतील. याच मातीतला पालकमंत्री जिल्ह्याला दिला तर अनेक विकासकामं होतील. त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून देऊनही काही करता येत नसेल तर आमच्या भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करु असंही मंत्री तानाजी सावंत म्हणाले. त्यामुळे आता एकंदरीत भाजप आणि शिदे गटातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.