सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया, ‘कोणतीही दिरंगाई केली नाही’

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया, ‘कोणतीही दिरंगाई केली नाही’

Rahul Narvekar : एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर होत असलेल्या दिरंगाईच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचा चांगलेच फटकारले आहे. कोर्टाच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आपण कोणतीही दिरंगाई केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाकडून दावा केला जातो की तीन वेळा नोटीस देऊन देखील निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आम्हाला कोर्टात यावे लागले. यावर नार्वेकर म्हणाले की निर्णय कोणाच्या मागणीवरुन होऊ शकत नाही. कायदेशीर नियम आणि तरतूद यांचे पालन करुनच निर्णय घेतले जातील. हा निर्णय करताना कोणताही उशीर केला जाणार नाही. तसंच कोणतीही घाई केली जाणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

नार्वेकर अन् शिंदे गट बॅकफूटवर; ठाकरे गटाला दिलासा : सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलं?

माझ्यापर्यंत अजून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर कॉपी आली नाही. त्यानंतर मी या विषयावर सविस्तर बोलणं, नार्वेकर यांनी सांगितले. ठाकरे गटाकडून काही कागदपत्र गहाळ झाली आहेत का? याची तपासणी केली जात आहे. यावर नार्वेकर म्हणाले त्यांना तो अधिकार आहे.

सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यासाठी उशीर केला जातोय असा आक्षेप घेण्यात आला. यावर नार्वेकर म्हणाले माझ्यापर्यंत अजून माहिती आली नाही. कोर्टात आज जे युक्तिवाद झाले त्याची प्रत माझ्याकडे आली नाही. ती आल्यानंतर समजून घेऊन मी कोर्टात भूमिका मांडली जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

Shivsena : CM शिंदेंचे टेन्शन वाढले; आमदार अपात्रतेवरुन सरन्यायाधीशांनी टोचले राहुल नार्वेकरांचे कान

सुप्रीम कोर्टाने हे अधोरेखीत केलं की विधानसभा अध्यक्ष हे संविधानिक पद आहे. त्यामुळे त्या पदाचा कोणताही उल्लेख कोर्टात होणे अपेक्षित नाही, असं मी ऐकलं आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube