Sanjay Raut : …तर महाराष्ट्रावर उपकार होतील, राऊत शिंदे-फडणवीसांवर बरसले
मुंबई : ‘पंतप्रधान उद्या येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून त्यांना विनंती केली पाहिजे. की, आमचे सव्वा दोन किंवा अडीच लाखाचे उद्योग जे महाराष्ट्रातून पळून नेले ते आम्हाला परत द्या. जर ते हे उद्या सांगू शकले तर महाराष्ट्रावर उपकार होईल. दावोसचे 88 हजार कोटीनंतर पाहू आधी आमचं जे गेलं ते आम्हाला परत द्या.’ अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
‘पंतप्रधानांची सुरक्षा ही सर्वोच्च आहे. पंतप्रधानांच आम्ही मुंबईत स्वागतच करतो. मुंबई अत्यंत सुरक्षित शहर आहे. पंतप्रधान मोदी ज्या कामांच्या उद्घटनासाठी येत आहेत त्यातील बरीच काम शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारने केली आहे. ते एका अर्थाने आमच्याच कामावर शिक्कामेर्तब करत आहेत.’
‘तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावत आहात. पण त्यांचे पुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरेंना आमंत्रण देत नाही. मात्र याचा एक प्रोटोकॉल असतो. पण हे सत्ताधारी राजकारण करत असून उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे बाप पळवणारी टोळी आलिय हे खरं आहे. तर आम्ही जेव्हा सावरकरांचा फोटो लावला तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना बोलावले होते.’ असं संजय राऊत म्हणाले.
‘फडणवीस हे बदला घेत आहेत की, नाही माहीत नाही पण राज्यात सूड आणि बदल्याचं राजकारण सुरू आहे. तर कोरोना काळात डॉक्टरांचां तुटवडा कमी पडत होता. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने यंत्रणा उभ्या केल्या. दावोसला काय चालत आम्हाला माहित आहे.
अशा प्रकारचे रोजगार मेळावे हे जगभरात होत असतात. तो जागतिक मेळावा एक असतो. प्रत्यक्ष 88 हजार कोटींच्या विटा रचल्या जातील तेव्हा आम्ही बोलू. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोस गेले. तेथे काय मिळाले याचे हिशेब नंतर पाहू.’ असंही खासदार संजय राऊत म्हणाले ते माध्यमांशी बोलत होते.