Union Cabinet Expansion : शिंदे गटाचे तीन खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात ? ‘ही’ नावं चर्चेत

Union Cabinet Expansion : शिंदे गटाचे तीन खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात ? ‘ही’ नावं चर्चेत

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणाऱ्या शिंदे गटाच्या तीन खासदारांना ही एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मंत्रिपदांसाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची नाव चर्चेत आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देत पश्चिम महाराष्ट्रावर पकड ठेवण्याचा भाजपचा उद्देश आहे. तर याचसाठी विदर्भातील प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद मिळू शकतं.

उद्धव ठाकरे, नितिश कुमार, सुखवीर सिंग बादल यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाच्या रूपाने एक साथीदार मिळाला आहे. त्यामुळे आता होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटाला संधी मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube