Uday Samant ‘…तर त्यांनी राजकारण सोडावे’ संजय राऊत यांना आव्हान
“माझी किंवा माझ्या नातेवाईकांची एक इंचही जमीन रिफायनरी परिसरात असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र हे सिद्ध झाले नाही तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी राजकारण सोडायला हवे,” असे खुले आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाव न घेता दिले आहे. संजय राऊत यांनी आरोप केल्यांनतर उद्या सामंत यांनी त्यालाउत्तर दिल, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “पत्रकाराचा मृत्यूची घटना ही दुर्दैवी आहे. पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वत: पुढाकार घेणार आहे. संजय राऊत यांनी नाणार प्रकल्पाच्या भागात जमिनी कोणाच्या आहेत. कोण दलाल आहेत? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.”
पुढे ते म्हणाले की, “मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो की त्या ठिकाणी माझी तसेच माझ्या नातेवाईकांची एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र हे सिद्ध झाले नाही तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी राजकारण सोडायला हवे.”
संजय राऊत यांचा आरोप
या प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी उदय सामंत यांचा एक फोटो ट्वीट केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण होत आहेत.
व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता.
पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे.
त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली.शशिकांत चा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? pic.twitter.com/XRbZALhOxT— Sanjay Raut (@rautsanjay61) February 11, 2023
आता या फोटोविषयी संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. उदय सामंत यांचा मी या मृत्यूप्रकरणाशी संबंध लावत नाहीये, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. मी उदय सामंत यांचा या प्रकरणाशी संबंध लावत नाहीये. या निमित्ताने अनेक वेगवेगळे फोटो समोर आणले जातात. मात्र हा आरोपी किती चतूर आहे, असे मी म्हणत आहे. तो सध्या तुरुंगात आहे. मात्र त्याचे अनेक राजकीय लोकांबरोबर संबंध आहेत. राजकीय लोकांबरोबर फोटो काढणे आणि भ्रम निर्माण करणे, असे त्याच्याकडून केले गेले आहे. या प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात कोणाचाही दबाव नसावा, असे माझे स्पष्ट मत आहे.