‘कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीची आवश्यकता भासते तर…?’

‘कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीची आवश्यकता भासते तर…?’

Uddhav Thackeray criticizes BJP and Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रायगडमधील महाड येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? असा सवाल त्यांनी महाडच्या सभेतून केला आहे.

निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला पाहिजे. पंतप्रधानांनी 100 वेळा मन की बात केली. 100 वेळा बोलले म्हणजे सचिन तेंडूलकरच्या सेंचुरीची मजा येत नाही. जनतेच्या मन की बात होती का? 2014 साली काय बोलले होते ते त्यांनी खरं केलं आहे? महागाई कमी केली? नोकऱ्या मिळाल्या? उज्वला योजना मिळते का? त्यांनी केलेल्या घोषणा देखील आपण विसरुन गेलो. कोणी प्रश्न विचारला तर त्याला देशद्रोही ठरवून आतमध्ये टाकायचे. निवडणुका आल्या की जातीय दंगली भडकवायच्या. हिंदू-मुस्लिम वाद लावायचे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर केली.

‘बारसूत यायला वेळ नाही पण कानडी आप्पांचे भांडी घासायला गेलेत’

निवडणूक आयोगाने एकवेळ बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढला होता. का काढला होता तर हिंदुत्वाचा प्रचार केला होता. त्यावेळी बाबरी मशीद, राम मंदिर असे मुद्दे होते. पण आता पंतप्रधान बोलत आहेत कर्नाटकमधील मतदारांना, तुम्ही जेव्हा मतदानाला जाणार आहात त्यावेळी बजरंगबली की जय म्हणून मतदान करा. हा धर्मिक प्रचार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरीच मिळत नाही, ठाकरेंचा राणेंना टोला

निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला बजरंगबलीचं नाव घ्यावं लागतंय मग तुमच्याकडे सांगण्यासारखे दुसरे काम नाही का? काँग्रेसने बजरंग दलवर बंदी घालण्याची घोषणा केल्यावर तुमचं प्रेम येत असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला निघाला होतात मग तुमचं काय करायचं सांगा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube