Uddhav Thackeray : ‘निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक’

  • Written By: Published:
Uddhav Thackeray : ‘निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक’

मुंबई : गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि शिवसेना (Shivsena) नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) गटाला मिळालं आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे कुटुंबांकडून शिवेसना पक्ष निसटला आहे. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय आहे. दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असतानाच 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपवून आणि बेबंदशाहीला सुरुवात झालेली आहे, लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी तशी घोषणा करावी,  अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

ठाकरे म्हणाले, कोर्टातील निकाल लागेपर्यंत आयोगानं निकाल हे देणं चूकीचं आहे. आता निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र, राजमान्यता दिली तरी चोर तो चोरच आहे. धनुष्यबाण चोरला तरी तो कागदावर राहणार आहे. रावणाकडे आणि रामाकडेही धनुष्यबाण होते. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव हरले नव्हते. पण विजय रामचाच झाला. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देव्हाऱ्यातलं धनुष्यबाण दाखव म्हणाले, हे बाळासाहेबांनी पुजलेलं धनुष्यबाण आहे. हे धनुष्यबाण आमच्याकडे राहणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर कसा कब्जा मिळवला? वाचा आयोगाचा तर्क

दरम्यान, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला आहे. नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाविरुध्द आपण कोर्टात जाणार आहे. आता मैदानात उतरलो आहे, विजयाशिवाय शांत बसणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube